Silver Paplet  x
महाराष्ट्र

मासेप्रेमी खवय्यांनो सावधान! पापलेट तुमच्या ताटात दिसणार नाही? पापलेट मासा नामशेष होण्याच्या मार्गावर?

Silver Paplet : मच्छीप्रेमींसाठी आता महत्त्वाची बातमी..तुमच्या ताटातील पापलेट मासा नाहीसा होणार आहे... मात्र त्याची कारणं काय आहेत? राज्य माशाला वाचवण्यासाठी काय केलं पाहिजे?

Suprim Maskar

पापलेट म्हटलं कि, मत्स्यहारी खवय्यांच्या तोंडाला पाणी नाही सुटलं तर नवल....छान चव, रुचकर, अन्य माशांच्या तुलनेत कमी काटे आणि भरपूर पोषणमूल्ये असल्याने पापलेट हा दर्दी, आणि नवख्यांचाही आवडीचा मासा... मात्र आता हाच पापलेट मासा तुमच्या ताटातून गायब होणार आहे...राज्य मासा म्हणून दर्जा लाभलेला 'सारंगा' अर्थात 'सिल्वहर पापलेट मासा' सध्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. हा मासा नामशेष होण्यामागे नेमकी कारणं काय पाहूयात...

पापलेट मासा किनारपट्टीवरील अर्थव्यवस्थेत महत्त्वाचा आहे. मोठया प्रमाणात या माशाची निर्यात होते. मात्र पालघरमधील सातपाटी मच्छीमार सोसायटीच्या आकडेवारी नुसार गेल्या 12 वर्षात पापलेटच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. 100 ग्रॅमच्या आत असलेल्या पिल्लांचीच मोठ्या प्रमाणात मासेमारी होत असल्यानं अर्धा किलोहून अधिक वजनाच्या मोठ्या आकाराचा पापलेट सापडण्याच्या प्रमाणात 95 टक्के घट झाली आहे. उत्पादन निव्वळ पाच टक्क्यावर आले आहे.

मच्छिमार संघटना -

मुळात स्थानिक पातळीवर या माशाचे उत्पादन घटत असल्याने त्याचे संवर्धन व्हावे या उद्देशाने त्याला राज्य मासाचा दर्जा देण्यात आला. मात्र वास्तव वेगळे आहे.

कमी होत चाललेला हा चविष्ट पापलेट मासा वाचवण्यासाठी सरकार नेमकी काय भूमिका घेतंय हे पाहणं महत्त्वाचं आहे. तसचं मच्छिमार संस्था, व्यावसायिकांचीही जबाबदारी आहे. पापलेट प्रजातीच्या संवर्धनासाठी त्यांच्या पिल्लांची मासेमारी थांबवणं काळाजी गरज बनली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भारत पीओके ताब्यात घेणार? राजनाथ सिंहांनी पाकिस्तानची झोप उडवली

Maharashtra: ओल्या दुष्काळग्रस्तांची 3164 रूपयांवर बोळवण? मदतीवरून आरोप-प्रत्यारोप सुरू

Solapur Flood: सोलापूर महापूर! २९ गावं पुराच्या पाण्यात; ग्रामीण भागातील शाळांना सुट्टी जाहीर

Heart Disease: हृदयरोगाच्या 'या' सामान्य लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करु नका, अन्यथा होईल पश्चाताप

TET Exam : शिक्षकांनो, दिवाळीत करा परीक्षेचा अभ्यास! नापास झालात तर सक्तीची निवृत्ती

SCROLL FOR NEXT