Thackeray Sena launches ‘Maza Desh Maza Kunku’ campaign against Indo-Pak cricket match, women activists protest strongly. saam tv
महाराष्ट्र

India-Pakistan Match: 'माझा देश माझं कुंकू' मोहीम;भारत-पाक सामन्यावरुन ठाकरे आक्रमक

Politics Over India-Pakistan Match: भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याच्या निषेधार्थ ठाकरे सेनेने 'माझा देश माझा कुंकू' ही राष्ट्रवादी मोहीम सुरू केली आहे. महिला शाखेने पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले आहे, ज्यामुळे महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापले आहे.

Bharat Mohalkar

  • ठाकरे सेनेनं ‘माझा देश माझं कुंकू’ मोहीम सुरू केली.

  • पाकिस्तानसोबतच्या क्रिकेट सामन्याविरोधात आंदोलन.

  • महिला कार्यकर्त्यांचा मोदींना थेट इशारा

कुरापतखोर पाकिस्तानसोबत क्रिकेट मॅचविरोधात ठाकरेसेना आक्रमक झालीय.. तर ठाकरे सेनेच्या महिलांनी मोदींना खिंडीत गाठण्याची योजना आखलीय. मात्र ठाकरे सेनेची रणनीती काय आहे? पाहूयात. ऑपरेशन सिंदूरनंतर रक्त आणि पाणी सोबत वाहू शकत नाही, अशी भूमिका मोदींनी जाहीर केली. त्यानंतरही आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान सामना होणार आहे. त्याला विरोध करण्यासाठी ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांची बैठक घेत माझा देश माझं कुंकू मोहीम राबवून मोदींची कोंडी कऱण्याची योजना आखलीय.

खरंतर पहेलगाममध्ये पाकच्या दहशतवाद्यांनी निष्पापांची हत्या करत 26 महिलांचं कुंकू पुसलं.. त्याचा बदला घेण्यासाठी भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी रक्तासोबत पाणी, चर्चा आणि व्यापार एकत्र चालू शकत नसल्याचा इशारा दिला. दुसरीकडे भारताविरोधात कागाळ्या करणाऱ्या पाकिस्तानविरोधातील सामन्याला सरकारने परवानगी दिली.

त्यावरुन ठाकरे सेनेच्या महिला 14 सप्टेंबरला माझा देश, माझं कुंकू मोहीम राबवणार आहेत. त्याला भाजपनंही जावेद मियाँच्या भेटीचा दाखला देत माझा जावेद माझी बिर्याणी म्हणत डिवचलंय. संपूर्ण जगाचं लक्ष लागलेला आशिया कपमधील भारत पाकिस्तान हायहोल्टेज सामना 14 सप्टेंबरला दुबईत होणार आहे. मात्र या सामन्याला फक्त ठाकरे सेनाच नाही तर देशप्रेमींकडून विरोध केला जातोय.

मात्र फक्त सरकारचे नाही तर सुप्रीम कोर्टानेही सामन्यावर बंदी घालण्यास नकार दिलाय. त्यामुळे पहलगाम हल्ल्यातील शहीदांच्या नातेवाईकांच्या जखमांवर मीठ चोळणाऱ्या सामन्याला विरोध वाढत चालला असतानाही सरकारनं सामना खेळवण्याचा घेतलेला निर्णय ही सरकारची दुतोंडी भूमिका असल्याची चर्चा रंगलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: निवडणूक आयोग सत्ताधारी पक्षाचे बाहुले झाले आहे का? जयंत पाटलांची टीका

Rava Khobra Ladoo Recipe: संध्याकाळी गोड खाण्याची इच्छा होते? मग घरी बनवा टेस्टी आणि हेल्दी रवा खोबरं लाडू

Raj Thackeray : ...अन् तळपायाची आग मस्तकात गेली; निवडणूक आयोगावर राज ठाकरे संतापले, नेमकं काय घडलं? VIDEO

BMC Recruitment : मुंबई महापालिकेत नोकरीची संधी; पगार ३०,००० रुपये; आजच करा अर्ज

Jio Special Offer: जिओचा डबल धमाका! एका प्लॅनसोबत दुसरा प्लॅन फ्री, काय आहे ऑफर जाणून घ्या

SCROLL FOR NEXT