Bhandara Politics News Saam
महाराष्ट्र

विदर्भात भाजपाला धक्का! बड्या नेत्यासह समर्थकांनी हाती बांधलं घड्याळ; राजकीय वर्तुळात खळबळ

Bhandara Politics News: भंडाऱ्याच्या तुमसर पंचायत समितीचे भाजपचे माजी सभापती नंदू रहांगडाले यांनी आपल्या समर्थकांसह आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यामुळे भाजपला मोठा धक्का बसला आहे.

Bhagyashree Kamble

  • भाजपचे माजी पंचायत समिती सभापती नंदू रहांगडाले राष्ट्रवादीत दाखल.

  • प्रफुल पटेल यांच्या उपस्थितीत मुंबईत पक्षप्रवेश पार पडला.

  • आमदार राजू कारेमोरे यांच्या नेतृत्वात समर्थकांसह पक्षप्रवेश.

  • आगामी तुमसर नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला बळ.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना अवघे काही महिने शिल्लक आहेत. नेत्यांनी मोर्चेबांधणीला सुरूवात केली आहे. राज्यात राजकीय वारे वेगाने वाहू लागले आहेत. अशातच भंडाऱ्यात मोठी राजकीय घडामोड घडली आहे. भंडाऱ्याच्या तुमसर पंचायत समितीचे भाजपचे माजी सभापती नंदू रहांगडाले यांनी भाजपची साथ सोडली आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात जाहीर प्रवेश केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून नंदू रहांगडाले हे भाजपची साथ सोडणार असल्याची चर्चा रंगली होती. अखेर त्यांनी आज त्यांच्या समर्थकांसह आज अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांचा पक्षप्रवेश भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. नंदू रहांगडाले हे सध्या भाजपचे पंचायत समितीचे गट नेते आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू कारेमोरे यांच्या नेतृत्वात नंदु रहांगडाले यांनी पक्षप्रवेश केला. यावेळी नंदु रहांगडाले यांच्या समर्थकांनीही भाजपची साथ सोडली. त्यांनी नंदु रहांगडालेंसोबत अजित पवारांची साथ दिली. हा पक्षप्रवेश सोहळा मुंबईत पार पडला असून, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पार पडला.

तुमसर नगरपालिकेची आगामी काळात निवडणूक होत आहे. या दृष्टीने हा पक्षप्रवेश राष्ट्रवादी काँग्रेससाठी महत्त्वाचा मानला जातोय. विशेष म्हणजे, नंदू रहांगडाले हे भाजपच्या तिकिटावर पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आले होते. मात्र, ते शरद पवार गटाचे माजी आमदार चरण वाघमारे यांचे कट्टर समर्थक म्हणूनही ओळखले जातात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope : जोडीदाराशी भांडण होणार; ५ राशींचे लोक घरगुती गोष्टीत अडकून पडणार, वाचा राशीभविष्य

Maharashtra Live News Update: माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे यांचे पुन्हा मुख्यमंत्र्यांना पत्र

Kalyan Street Dogs : कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत; एकाच दिवशी ३५ जणांना घेतला चावा, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Shocking ! भेटायला बोलून मुलाचे कपडे उतरवले; नंतर बनवला अश्लील व्हिडिओ मग..., घटना वाचून उडेल थरकाप

हिंगोलीत भर बाजारपेठेत तरुणावर चाकू हल्ला, पाहा थरारक VIDEO

SCROLL FOR NEXT