महाराष्ट्र

"पुढाऱ्यांची पोरं पुढारीच होणार हा निसर्गाचा नियम", भाजपच्या बबनराव लोणीकरांचं वक्तव्य

लोणीकर यांचे चिरंजीव राहुल लोणीकर यांची भाजपा युवा मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

साम टिव्ही ब्युरो

>> लक्ष्मण सांळुके

जालना : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घराणेशाहीचा मुद्दा आपल्या लाल किल्ल्यावरुन केलेल्या भाषणात उपस्थित केला होता. नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) घराणेशाहीमुळे राजकीय क्षेत्राचे नुकसान झाले आहे. घराणेशाही नष्ट करायला हवी, असं म्हटलं होतं. मात्र नरेंद्र मोदींच्या या भूमिकेचा भाजपच्याच नेत्यांना विसर पडल्याचं दिसून येत आहे. आमदाराचा मुलगा आमदार आणि खासदाराचा मुलगा खासदार होणार, असं भाजप नेते बबनराव लोणीकर यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी घराणेशाहीच्या मुद्द्यावर सातत्याने काँग्रेसवर टीकास्त्र सोडत असतात. राज्यातील भाजपचे नेतेही काँग्रेस, राष्ट्रवादीवर टीका करताना दिसतात. मात्र बबनराव लोणीकरांनी भाजपच्या या भूमिकेला केराची टोपली दाखवली आहे. (Latest Marathi News)

आमदारांची पोरं आमदार,खासदारांची पोरं खासदार, डॉक्टरांची मुलं डॉक्टर, वकिलांची पोरं वकील आणि पुढाऱ्यांची पोरं पुढारी हा निसर्गाचा नियम असल्याचं भाजपचे जालन्यातील परतुरचे आमदार बबनराव लोणीकर यांनी म्हटलंय. लोणीकर यांचे चिरंजीव राहुल लोणीकर यांची भाजपा युवा मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. यावेळी जालन्यात त्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.

राहुल लोणीकर यांच्या सत्कार सोहळ्याला भाजपातील पहिल्या फळीतील नेते उपस्थित नसल्याचं पाहून लोणीकर यांनी स्वपक्षीय नेत्यांवर देखील टीकास्त्र सोडलं. मराठवाड्यातील नेते हे खेकड्यासारखं खाली ओढतात.

राहुलला आशीर्वाद देण्यासाठी पहिल्या फळीतील कुणी आलं नसलं तरी दुसऱ्या फळीतील सर्व नेते हजर असल्याचा आनंद झाला, असं लोणीकर म्हणाले. जे लोक रस्त्यात जास्त खड्डे खोदतील, त्या खड्ड्यातून तुला पुढं जायचं आहे, असा सल्ला मुलाला देत लोणीकर यांनी आपल्याच पक्षातील नेत्यांवर नाव न घेता टीकास्त्र सोडलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India vs South Africa T20 WC: दक्षिण आफ्रिकेच्या संघासमोर टीम इंडियाच्या फलंदाजांनी नांगी टाकली; 111 धावांवर अख्खा संघ All Out

Monday Horoscope : थकवा, चिडचिड आणि शब्दांवर नियंत्रण ठेवा; ५ राशींच्या लोकांनी वाणीवर संयम ठेवा,अन्यथा...

बाजारातून घरी परतताना काळाचा घाला, ५ मजुरांचा जागीच मृत्यू; अपघाताचं कारण आलं समोर

Ladki Bahin Yojana: लाडकी बहिणींना आता १५०० नाहीतर २१०० रुपये मिळणार; अर्थसंकल्पीय अधिवेशनात होणार घोषणा?

55 वर्षांचा विरह, रक्ताची नाती पुन्हा एकत्र, 55 वर्षांनंतर भेटीची कहाणी, दोन्ही भावांच्या डोळ्यात पाणी

SCROLL FOR NEXT