महाराष्ट्रासाठी गोड बातमी! पुण्यात ५०० कोटींच्या प्रकल्पाला मंजूरी; ५ हजार तरुणांना मिळणार रोजगार

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ट्विट करत एक आनंदाची बातमी दिली आहे.
Devendra Fadnavis, Narendra Modi
Devendra Fadnavis, Narendra Modi Saam TV
Published On

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ट्विट करत एक आनंदाची बातमी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात तब्बल ५०० कोटींच्या प्रकल्पाला मंजूरी दिली असल्याचं फडणवीसांनी म्हटलं आहे. या प्रकल्पामुळे महाराष्ट्रात ५ हजार रोजगाराऱ्या संधी निर्माण होतील, असा दावाही फडणवीसांनी केलाय.

Devendra Fadnavis, Narendra Modi
Congress : खोक्यांचा वाद आणखीच पेटणार? रवी राणांच्या दिलगिरीनंतर काँग्रेस नेत्याला वेगळीच शंका

'देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथे इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. हा प्रोजेक्ट नॅशनल पॉलिसी ऑन इलेक्ट्रॉनिक्स अंतर्गत असणार आहे', असं फडणवीसांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

पुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथे होणारा इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर प्रकल्प तब्बल 297.11 एकरमध्ये पसरले जाईल आणि याच्या विकासासाठी 492.85 कोटी रुपये खर्च केले जातील. यामधील २०७.९८ कोटी रुपये केंद्र सरकार देणार आहे. असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे.

युवकांना रोजगार देणारे ४ मोठे प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्याने विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले होते. राज्यात नव्याने स्थापन झालेले शिंदे-फडणवीस सरकार हे गुजरातचे सरकार आहे, अशी टीकाही विरोधकांनी केली होती. मात्र, आज देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत महाराष्ट्रात लवकरच नवा प्रकल्प येणार असल्याचं सांगितलं आहे.

५ हजार युवकांना मिळणार रोजगार

दरम्यान, रांजणगावमध्ये होणाऱ्या या नव्या प्रकल्पामुळे राज्यातील ५ हजार युवकांना नोकरीची संधी निर्माण करेल. या प्रकल्पाचे लक्ष्य २ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करणे असेल, असंही देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये सांगितलं आहे. हा प्रकल्प पुढील ३२ महिन्यात कार्यान्वित होणार असल्याचंही फडणवीस म्हणाले.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com