Maharashtra Politics Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: ठाकरे बंधुंच्या युतीनंतर भाजपची मोठी खेळी, बालेकिल्ल्यात शिवसेनेला पाडलं भगदाड; ३ दिग्गज नेते गळाला

Municipal Elections Nashik: नाशिकमध्ये मोठी राजकीय घडामोड घडली. शिवसेना-मनसे युतीनंतर भाजपने ठाकरेसेनेला धक्का दिला. ठाकरेंचे दोन आणि काँग्रेसचा एक दिग्गज नेता भाजपच्या गळाला लागला आहे.

Priya More

Summary:

  • नाशिकमध्ये भाजपची मोठी राजकीय खेळी

  • ठाकरेसेना आणि काँग्रेसला एकाच वेळी मोठा धक्का

  • २ माजी महापौर भाजपमध्ये जाणार

  • उल्हासनगरमध्ये उबाठाला मोठा झटका

महापालिका निवडणुकीसाठी भाजपने चांगलीच कंबर कसली आहे. भाजपकडून ऑपरेशन लोटस सुरू असून जोरदार इनकमिंग सुरू आहे. त्यामुळे पालिका निवडणुकीपूर्वी भाजपची ताकद चांगलीच वाढताना दिसत आहे. भाजप मविआसह महायुतीमधील घटक पक्षांना एकापाठोपाठ एक धक्के देताना दिसत आहे. अशातच ठाकरेसेना आणि मनसेच्या युतीनंतर नाशिकमध्ये भाजपमध्ये मोठी खेळी केली. भाजपने नाशिकमध्ये ठाकरेसेनेला जोरदार धक्का दिला. २ दिग्गज नेते भाजपच्या गळाला लागले असून ते लवकरच कमळ हाती घेणार आहेत.

नाशिकमध्ये भाजपने एकाच वेळी ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसला मोठं खिंडार पाडले. नाशिकमधील दोन माजी महापौर भाजपच्या गळाला लागले आहेत. माजी महापौर विनायक पांडे, यतिन वाघ भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. तर काँग्रेसचे दिग्गज नेते शाहू खैरे देखील भाजपाच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा होणार आहे. विनायक पांडे हे ठाकरेंच्या शिवसेनेचे दिग्गज नेते आहेत. तर शाहू खैरे हे देखील काँग्रेसचे मोठे नेते आहेत.

विनायक पांडे, यतिन वाघ आणि शाहू खैरे या दिग्गज नेत्यांनी पक्षाची साथ सोडल्यामुळे महापालिकेपूर्वी पक्षाचे मोठे नुकसान झाल्याचे म्हटले जात आहे. महत्वाचे म्हणजे नाशिकमधील ठाकरेसेनेच्या या दिग्गज नेत्यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी युतीची घोषणा केल्यानंतर विनायक पांडे आणि यतिन वाघ जल्लोष केला होता. त्यानंतर त्यांनी पक्षाची साथ सोडत भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. आता ते लवकरच पक्षप्रवेश करणार आहेत. त्यामुळे नाशिकच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

तर दुसरीकडे उल्हासनगरमध्ये भाजपच्या ऑपरेशन लोटसला यश आले आहे. उल्हासनगरमध्ये भाजपने उद्धव ठाकरेंना मोठा धक्का दिला. शिवसेना ठाकरे गटाच्या बड्या नेत्याने पक्षाची साथ सोडली. कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत भाजपात प्रवेश केला. मुंबईत भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत धनंजय बोडारे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. उल्हासनगरमध्ये शिवसेना ठाकरे गटाचा आधार भाजपमध्ये गेल्यामुळे पालिका निवडणुकीपूर्वी पक्षाचे मोठे नुकसान झाले. धनंजय बोडारे यांच्या प्रवेशामुळे उल्हासनगर पूर्वमध्ये भाजपाची ताकद वाढली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : सुप्रिया सुळेचा वंचितच्या शहर अध्यक्षांना फोन...

Christmas Celebration : भारतात ख्रिसमस कसा साजरा केला जातो? जाणून घ्या

Actress Death: प्रसिद्ध अभिनेत्रीची हत्या, चाकूने सपासप वार करत संपवलं; बॉयफ्रेंडला अटक

Western Railway : पश्चिम रेल्वेवर 'या' दिवशी ३०० लोकल रद्द! नेमकं कारण काय? जाणून घ्या

Cracking knuckles: हाताची बोटं कटकट मोडण्याची सवय आहे; संधिवात होऊ शकतो? डॉक्टरांनी काय सांगितलं? वर्षानुवर्षे मनात असलेला गैरसमज होईल दूर

SCROLL FOR NEXT