Fadnavis Defends Naik Nimbalkar Amid Controversy Saam
महाराष्ट्र

निंबाळकरांचा काहीच संबंध नाही, डॉक्टर भगिनीला न्याय देणारच; फलटणमध्ये फडणवीसांचा विरोधाकांवर हल्लाबोल

Fadnavis Defends Naik Nimbalkar Amid Controversy: फलटण उपजिल्हा रूग्णालयातील डॉक्टर तरूणीच्या आत्महत्या प्रकरणाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. भगिनीला न्याय देणार असल्याचं सांगितलं.

Bhagyashree Kamble

सध्या राज्यात साताऱ्यातील फलटण येथील उपजिल्हा रूग्णलयातील डॉक्टर तरूणीच्या आत्महत्या प्रकरणानं खळबळ उडवली आहे. डॉक्टर तरूणीनं तळहातावर लिहिलेल्या सुसाईड नोटवरून २ जणांना ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणी पोलीस आणि राजकीय दबाव असल्याचा आरोप पीडित तरूणीच्या कुटुंबियांनी केला. यामुळे संशयाची सुई माजी खासगार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर गेली. त्यांच्यावर विरोधकांकडून टिकेची तोफ डागण्यात आली. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. दरम्यान, आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फलटण दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी भगिनीला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही, असं म्हटलं आहे. तसेच निंबाळकरांविरोधात लावण्यात आलेले आरोप फेटाळून लावले.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज फलटण दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी विकासकामांचं आणि भूमिपूजन केलं. यावेळी भाषण देताना डॉक्टर तरूणीला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही, असं त्यांनी ठणकावून सांगितलं. तसेच या प्रकरणात रणजितसिंह नाईक निंबाळकर,सचिन पाटील यांचे नाव घुसवण्याचा प्रयत्न केला गेला, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

'आमच्या भगिनीने आत्महत्या केली. तळहातावर कारण लिहून आयुष्य संपवलं. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून आरोपींना ताब्यात घेतलं. सत्य बाहेर येतंय. आमच्य भगिनीला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही', असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. 'प्रत्येक गोष्टीत राजकारण घुसवायचं, असं निंदनीय प्रयत्न सुरूये. या प्रकरणात रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि सचिन पाटील यांचे नाव घुसवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या राज्याला देवा भाऊ माहितीय. एवढीशी जरी शंका असती तर, प्रोग्राम रद्द केला असता, मी आलोच नसतो', असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

'अशा बाबतीत मी पक्ष पाहत नाही. व्यक्ती पाहत नाही. राजकारण पाहत नाही. जिथे माझ्या लहान भगिनीचा विषय आहे, तिथे कुठलीही कॉम्प्रमाईज मी करीत नाही', असंही फडणवीस म्हणाले. 'प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम जर कुणी करत असेल तर, प्रत्येक गोष्टीत जर कुणी राजकीय भूमिका कुणी घेण्याचा प्रयत्न करत असेल तर, ते सहन करणार नाही. त्याला मी उत्तर देणार', असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : शरद पवारांना मोठा धक्का; निवडणुकीच्या तोंडावर दोन बड्या नेत्यांनी पक्षाची साथ सोडली

Shraddha Kapoor: 252 कोटींच्या ड्रग्स प्रकरणात का येतयं श्रद्धा कपूरचं नाव?

Blood Pressure: थंडीत ब्लड प्रेशर खूप वाढतोय? मग हे फूड्स ठरतील फायदेशीर

Maharashtra Live News Update: मुंबईसह उपनगरात सीएनजी तुटवडा

Mumbai Tourism : मुंबईकरांनो गुलाबी थंडीत पिकनिक प्लान करा, बोरीवलीत आहे २ सुपरकूल ठिकाणं

SCROLL FOR NEXT