BJP Leader Rada Video Saam Tv
महाराष्ट्र

भाजप नेत्याचा भररस्त्यात राडा! लाठ्याकाठ्या अन् दगडाने अमानुष मारहाण; ठाकरेंच्या शिलेदारानं पोस्ट केला थरकाप उडणारा VIDEO

BJP Leader Rada Video: भाजपचे मंत्री अतुल सावे यांचे समर्थक आणि माजी नगरसेवकाने भररस्त्यात राडा केला. एका व्यक्तीला भररस्त्यात लाथाबुक्क्या आणि दगडाने मारहाण करण्यात आली. ठाकरेचे नेते अंबादास दानवे यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला.

Priya More

Summary -

  • अंबादास दानवेंनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला

  • भाजप नेत्याने भरदिवसा रस्त्यावर एका व्यक्तीला अमानुष मारहाण केली

  • ही व्यक्ती भाजप मंत्री अतुल सावे यांचा निकटवर्तीय असल्याची माहिती

  • सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होत आहे

राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी सोशल मीडियावर मारहाणीचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. एका व्यक्तीला भररस्त्यात अक्षरश: दगडाने मारहाण केली जात असल्याचा हा व्हिडीओ आहे. हा थरकाप उडवणारा व्हिडीओ शेअर करत अंबादास दानवे यांनी आपल्या पोस्टमध्ये भाजपचे मंत्री अतुल सावे यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. यामध्ये त्यांनी मारहाण करणारी व्यक्ती अतुल सावे यांच्या जवळची असल्याचे म्हटले आहे. हा व्हिडीओ व्हायरल होत असून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.

अंबादास दानवे यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, भरदिवसा रस्त्यावर काही जण एका व्यक्तीला मारहाण करत आहेत. रस्त्यावर पाडून काठी, लाथाबुक्क्यांनी अन् दगडाने या व्यक्तीवर हल्ला केला जात आहे.५ ते ६ जण या व्यक्तीला अमानुष मारहाण करत आहेत. पांढऱ्या रंगाची कपडे घातलेली आणि दाडीवाला व्यक्ती हा चक्क त्या व्यक्तीला दगडाने मारहाण करत आहे. हा अंगावर काटा आणणारा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. कोणत्या कारणावरून या व्यक्तीला मारहाण केली जात आहे यामागचे कारण समोर आले नाही.

अंबादास दानवे यांनी हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत भली मोठी पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, 'क्रूरता समोर आल्यावर कोणी मंत्रीपद गमावलं तर कुणी तुरुंगात सडतंय... पण मंत्री अतुल सावे यांचा 'खास माणूस' असलेला हा मारकुटा माजी नगरसेवक कायद्याला मात्र भीक घालत नाही. 'पार्टी विथ डिफरन्स'च्या छत्राखाली या असल्या धिंगाण्याला किती काळ संरक्षण देणार मेवाभाऊ? '​

तसंच, 'दगडाखाली दबलेला तो लाचार माणूस आज कुठे आहे? सत्तेच्या माजात त्याचा आवाजच कायमचा दबून गेला? ज्यांच्या हातात कायदा आहे, त्यांनी गुन्हेगाराची 'भक्ती' करण्यापेक्षा पीडिताला न्याय देण्याची हिंमत दाखवावी. ​सत्तेची ऊब असली की गुन्हेगारांचे हात कुणीही बांधू शकत नाही, हेच आजच्या सत्ताधारी मंडळींचे वास्तव आहे! बरोबर न देवभाऊ?', असे अंबादास दानवे यांनी म्हटले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akshaya Tritya: तीन राशींसाठी अक्षय तृतीया असेल खास; करिअरमधील प्रगतीसह संपत्तीत होईल वाढ

Custard Recipe: उन्हाळ्याच्या सुट्टीत लहान मुलांसाठी बनवा क्रीमी आणि स्वादिष्ट कस्टर्ड, वाचा सोपी रेसिपी

सुनेत्रा पवारांच्या विरोधात बारामतीत निवडणूक लढण्याचा काँग्रेसचा निर्णय योग्य - शरद पवार

तनपुरेंना थेट केरळमधून मुख्यमंत्री फडणवीसांचा फोन, पुढच्या क्षणाला निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?

Maharashtra News Live Update: बारामती पोटनिवडणुकीसाठी 55 उमेदवारांनी 68 उमेदवारी अर्ज दाखल केले

SCROLL FOR NEXT