ठाण्याच्या सुभेदारीवरुन महायुतीत वादाची ठिणगी पडलीय.. भाजपचे मंत्री गणेश नाईकांनी ठाणे महापालिका जिंकण्याचा निर्धार करतानाच एकनाथ शिंदेंचा रावण असा उल्लेख केलाय.. ठाणे महापालिकेतील रावणाच्या अहंकाराचं दहन करण्यासाठी तुम्ही तयार आहात का? असा सवाल नाईकांनी भाजप पदाधिकाऱ्यांना केला... त्यावरुन शिंदेसेना आक्रमक झालीय.. तर मंत्री उदय सामंतांनी नाईकांना जशास तसं उत्तर देण्याची रणनीती आखलीय...
एकनाथ शिंदेंवर कोणी टीका करत असेल तर तातडीने पत्रकार परिषद घेऊन उत्तर द्या.. त्यासाठी आमची पूर्ण मुभा आहे... खरंतर हा वाद सुरु झाला तो पालघरमधील गणेश नाईकांच्या सभेतून.. नाईकांनी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपदाची लॉटरी लागली म्हणत शिंदेंना डिवचलं होतं.
नाईक एवढ्यावरच थांबले नाहीत.. तर त्यांनी नवी मुंबईपाठोपाठ ठाणे जिल्ह्यातील महापालिका जिंकण्याचा दावा केलाय...
मात्र नाईक शिंदे वादामुळे विरोधकांच्या हाती आयतं कोलित मिळालंय.. सातत्याने नाईक शिंदेंना लक्ष्य करत असल्याने ठाकरे सेनेने महायुतीत नेपाळसारखी अस्वस्थता असल्याचा टोला लगावलाय..
खरंतर भाजपनं महायुतीत शिंदेंना ठाण्यात शह देण्यासाठी गणेश नाईकांना मंत्रिपद दिल्याची चर्चा रंगली होती.. एवढंच नाही तर मंत्रिपद मिळाल्यानंतर नाईकांनी दर तीन महिन्याला शिंदेंच्या बालेकिल्ल्यात जनता दरबार घेणं सुरु केलं.. मात्र भाजप आणि शिंदेंसाठी ठाणे महत्वाचं का आहे? पाहूयात..
ठाणे शहर एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला आहे. याबरोबरच ठाणे जिल्ह्यात 6 महापालिका आहेत.. त्यापैकी 2 महापालिकांवर भाजपचं तर 4 महापालिकांवर शिंदेसेनेचं वर्चस्व आहे... एवढंच नाही तर या वादामागे ठाण्यावरील वर्चस्वाची लढाई हे कारण आहे... याबरोबरच शिंदेंच्या ताब्यातील महापालिका भाजपनं जिंकल्यास त्यांची जागा वाटपाचीच नाही तर सरकारमध्येही बार्गेनिंग पॉवर कमी होऊ शकते.
गणेश नाईक पुन्हा पुन्हा शिंदेंना डिवचत असल्याने महायुतीतच वादाची ठिणगी पडलीय.. त्यामुळे शिंदे विरुद्ध नाईक संघर्ष टोकाला गेलाय. मात्र आता आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि नाईकांकडून शिंदेंची कोंडी करुन शिंदेंना अस्वस्थ केलं जाणार की या वादावर तोडगा काढून महायुती एकदिलाने निवडणुकींना सामोरं जाणार? याकडे राज्याचं लक्ष लागलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.