Eknath Shinde ANd Uddhav Thackeray Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: बुलडाण्यात ठाकरेंचा शिंदेंना मोठा धक्का, शेकडो कार्यकर्त्यांनी 'मशाल' घेतली हाती

Eknath Shinde And Uddhav Thackeray: बुलडाण्यामध्ये एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसला. अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश केला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी ठाकरे गटाची बुलडाण्यात ताकद वाढली.

Priya More

Summary -

  • बुलडाण्यातील मेहकरमध्ये शेकडो शिंदे गट कार्यकर्त्यांचा उद्धव सेनेत प्रवेश.

  • आमदार सिद्धार्थ खरात यांच्या नेतृत्वाखाली 'मशाल' पुन्हा हाती घेतली.

  • निवडणुकीपूर्वी शिंदे गटाला मोठा धक्का, ठाकरे गटाची ताकद वाढली.

  • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उद्धव सेनेला मिळणार फायदा.

संजय जाधव, बुलडाणा

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सर्वच पक्षांमध्ये इनकमिंग आणि आऊटगोइंग सुरू आहे. दररोज मोठमोठे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा पक्षप्रवेश सुरू आहे. अशामध्ये बुलडाण्यामध्ये उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना मोठा धक्का दिला आहे. बुलडाण्यात मोठ्या संख्येने शिवसेना शिंदे गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश केला. हा शिंदे गटाला मोठा धक्का मानला जात आहे.

बुलडाण्यातील मेहकरमध्ये शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. निवडणुकीच्या तोंडावर शेकडो शिवसैनिक उद्धव सेनेत दाखल झाले आहेत. यावेळी "डरो मत.... येणारा काळ उद्धव सेनेचा असेल...!", असे म्हणत आमदार सिद्धार्थ खरात यांनी कार्यकर्त्यांना विश्वास दिला. बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर विधानसभा मतदारसंघ हा कायमच शिवसेनेसोबत राहिला आहे. शिवसेनेचे दोन गट पडल्यानंतरही या मतदारसंघात शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार सिद्धार्थ खरात हे प्रचंड मतांनी निवडून आले.

आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी देखील सिद्धार्थ खरात मैदानात उतरले असून त्यांच्यावर विश्वास ठेवत शिवसेनेच्या शिंदे गटात गेलेले शेकडो कार्यकर्त्यांनी पुन्हा सिद्धार्थ खरात यांच्या नेतृत्वात उद्धव सेनेत प्रवेश केला आहे. यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपूर्वीच शिंदे गटाला या मतदारसंघात मोठा धक्का बसल्याचे चित्र आहे.

यावेळी " डरो मत.... आगामी काळ हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच असेल..!", असा विश्वास सिद्धार्थ खरात यांनी कार्यकर्त्यांना दिला. मेहकर विधानसभा मतदारसंघामध्ये ठाकरे सेनेमध्ये इनकमिंग सुरूच आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघामध्ये ठाकरे गटाची ताकद चांगलीच वाढली आहे. हा शिंदे गटासाठी मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maratha Reservation : मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा धसका? मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक

Manoj Jarange Patil: भगवे रुमाल, टोप्या घालून ४०-५० पोलीस आंदोलनात शिरलेत; जरांगेंचा मोठा आरोप

Lip Care Tips: जास्त लिपस्टिक लावल्याने ओठ काळे होतात का? जाणून घ्या या मागील सत्य

Controversial Statement : प्रसिद्ध अभिनेत्याची तरुणीवर वादग्रस्त टिप्पणी; नेटकरी भडकले, व्हिडिओ व्हायरल

Maratha Reservation: सुप्रीम कोर्टाच्या निकालामुळे मराठा आरक्षण अडचणीत; उपसमितीसमोर पेच

SCROLL FOR NEXT