Politics on saif ali khan attack Saam Tv News
महाराष्ट्र

Saif Ali Khan Attack: सैफ अली खान हल्ला प्रकरणावरून राजकारण तापलं, शरद पवार गटाचा गंभीर आरोप; भाजपकडून थेट माफीची मागणी

Saif Ali Khan Attack: जितेंद्र आव्हाड यांचे राजकारण द्वेषाचे आहे. हे राज्यातील जनतेनं पाहीले आहे. सैफ अली खान याच्यावर जीवघेणा हल्ला झाला. याचं त्यांना काहीही घेणं देणं नाही- राम कुलकर्णी

Bhagyashree Kamble

अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर बॉलिवूडसह राजकीय वातावरण तापलं. काही विरोधी पक्षातील नेत्यांनी या मुद्द्याला धरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. सैफवर झालेल्या हल्ल्यानंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक दावा केला होता. हल्लेखोराला सैफचा मुलगा तैमुरला मारायचं होतं. तैमुर या हल्ल्यातून बचावला आहे. सत्य कुणीच सांगणार नाही. तैमुरच्या नावामुळे त्याचा द्वेष केला जात आहे, समाजात विकृती पसरलीय, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले होते. त्यांनी केलेल्या या दाव्यावर भाजप नेते राम कुलकर्णी यांनी प्रत्युत्तर देत आव्हाडांवर निशाणा साधलाय.

सैफ अली खानवर झालेला जीवघेणा हल्ल्यावरून राजकारण सुरू आहे. हा हल्ला जणू हिंदू कट्टर वाद्यांनी केल्याचा आरोप त्यांनी केलाय. द्वेषाची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न आव्हाड यांनी केलाय. त्यामुळे आव्हाड यांनी महाराष्ट्रातील जनतेची जाहीर माफी मागावी, असं मागणी भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केली आहे.

जितेंद्र आव्हाड यांचे राजकारण द्वेषाचे आहे. हे राज्यातील जनतेने पाहीले आहे. सैफ अली खान याच्यावर जीवघेणा हल्ला झाला. याचं त्यांना काहीही घेणं देणं नाही अथवा थोडीही संवेदना दिसली नाही. मात्र, या घटनेचा ते राजकारण करत आहेत. हा हल्ला जणू हिंदू कट्टर वाद्यांनी केल्याचा आरोप त्यांनी केलाय. तसेच त्यांनी द्वेषाची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप राम कुलकर्णी यांनी केला आहे.

मात्र, सैफ अली खानवर ज्याने हल्ला केला, त्या आरोपीला पोलिसांनी शोधून काढलं आहे. आरोपीच्या मुसक्या आवळल्या असून, तो बांगलादेशी निघाला आहे. यामुळे त्यांनी महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी, अशी मागणी भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी जितेंद्र आव्हाड यांच्याकडे केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Live Update : उद्धव ठाकरेंचे नेतृत्व कधीच वादात नव्हते, कपिल सिब्बल यांचा दावा; कोर्टातील सुनावणीचे क्षणाक्षणाचे अपडेट

Baba Vanga Prediction: 5 ते 9 ऑगस्टदरम्यान 'या' 5 राशींवर होणार पैशांचा वर्षाव? पाहा तुमची रास आहे का

KDMC Hospital : KDMC रुग्णालयात शिकाऊ डॉक्टरांचा हलगर्जीपणा! इंजेक्शनची सुई चिमुकल्याच्या कमरेत अडकली; धक्कादायक सत्य समोर

Virar Local Train: धावत्या लोकलसमोर थेट रुळांवर उभा राहिला तरुण, पुढे जे घडलं ते पाहून प्रवाशांनाही बसला मोठा धक्का

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी पावसाळ्यात नक्की खा 'या' 6 गावरान भाज्या

SCROLL FOR NEXT