Manasvi Choudhary
पावसाळ्यात वातावरणातील बदलांमुळे सर्दी, खोकला, पोटाचे विकार आणि संसर्गजन्य आजार होण्याचा धोका वाढतो. अशा वेळी शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी गावरान भाज्यांचे सेवन करणे महत्वाचे आहे.
गावरान भाज्या केवळ चवीलाच नाहीतर आरोग्यासाठीही फायदेशीर असतात. पावसाळ्यातच या भाज्या मिळतात त्यामुळे या खाणे आरोग्यासाठीही फायदेशीर मानले
पावसाळ्यात आळूच्या पानांची भाजी किंवा आळू वडी आवडीने खाल्ल्या जातात. या पानांमध्ये व्हिटॅमिन ए, सी, लोह आणि फायबरचे प्रमाण अधिक असते.
कर्टुले ही पावसाळ्यात येणारी अत्यंत गुणकारी रानभाजी आहे. यात भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर असतात. ही भाजी खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते
तांदुळजा गावरान भाजी आहे जी पावसाळ्यात मिळते. याभाजी मध्ये कॅल्शियम, लोह आणि विविध जीवनसत्त्वे असतात. ही भाजी खाल्ल्याने रक्ताची कमतरता दूर होते आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते
पावसाळ्याच्या चवळीची ताजी पाने किंवा भाजी खाणे शरीरासाठी खूप फायदेशीर मानले जाते. याभाजीमध्ये प्रथिने आणि खनिजेअसतात, जी शरीराला ताकद देतात आणि थकवा दूर करतात.
केवळ भोपळाच नव्हे, तर त्याची पाने आणि पिवळी फुलांची भाजी किंवा बेसन तुम्ही बनवू शकता. या भाजीमध्ये व्हिटॅमिन सी आणि आयर्न भरपूर असते जे शरीरासाठी फायदेशीर आहे.
रानभाज्यांमध्ये कुड्याच्या फुलांना आणि पानांना विशेष महत्त्व आहे. पावसाळ्यात ही भाजी खाल्ल्याने आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतात.