Sunil Shelke News
Sunil Shelke News Saam tv
महाराष्ट्र

Political News: किशोर आवारे हत्या प्रकरणी जबाबदार कोण? सुनील शेळके यांनी स्वत: दिलं स्पष्टीकरण

साम टिव्ही ब्युरो

दिलीप कांबळे

Sunil Shelke: जनसेवा विकास समितेचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्या हत्या प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांचे नाव समोर येत आहे. शेळकेंसह अन्य सहा व्यक्तींवर किशोर आवारे यांच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणी शेळके यांनी स्वत: आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. (Latest Marathi News)

आमदार सुनील शेळके यांनी पत्रकार परिषद घेत म्हटलं आहे की, किशोर आवारे आणि मी एकत्रीतपणे काम केलं आहे. त्यांच्यात आणि माझ्यात विचारांमध्ये मतभेद होते. दोघांमध्ये मनभेद कधीच नव्हता. मात्र तरीही काही व्यक्ती या गोष्टीचे राजकारण करत आहेत. माझी त्यांना विनंती आहे की, त्यांनी हे सर्व थांबवावे. पोलीसांना जी काही चौकशी करायची असेल त्या सर्व चौकशीला सामोरे जाण्यासाठी मी तयार आहे. मी पोलिसांना सहकार्य करत आहे.

जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे यांची काल दुपारी नगरपालिकेच्या आवारामध्ये हत्या करण्यात आली. या घटनेचा मी तीव्र शब्दांमध्ये निषेध व्यक्त करतो. कालची घटना झाली त्यानंतर आज सकाळी सात वाजता सुनील शेळके नॉटरीचेबल झालेत. त्यांचा फोन बंद आहे, अशा अनेक बातम्या सोशल मीडायावर पसरवण्यात आल्या. त्यामुळे ही पत्रकार परिषद घेणे माझ्यासाठी महत्वाचे आहे, असं शेळके म्हणाले.

कालची जी काही घटना झाली या घटनेमध्ये खरा आरोपी कोण आहे? त्यांनी असं का केलं यामागची सत्यता काय? त्या गुन्हेगारांची पार्श्वभूमी काय आहे? गुन्हेगार नेमके कोण आहेत याची सखोल चौकशी पोलीस खात्यातील सर्व अधिकारी प्रामाणिकपणे करण्याचं काम करत आहेत. हत्येच्या घटनेमुळे मावळ तालुक्याला वेगळा पायंडा पाडण्याचं काम राजकारणाच्या माध्यमातून किंवा समाजकारणाच्या माध्यमातून कुणीही करू नये, असं यावेळी सुनील शेळके (Sunil Shelake) यांनी म्हटलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CBSE Results 2024: प्रतीक्षा संपली! सीबीएसई १० आणि १२ वीचा निकाल कधी लागणार? महत्वाची अपडेट आली समोर

Loksabha Election: प्रसिद्ध गायक नंदेश उमप लोकसभेच्या रिंगणात; ईशान्य मुंबईमधून भरला अर्ज

Breakfast Recipe: नाश्त्याला बनवा १० मिनीटांत तयार होणारे दडपे पोहे

Benefits of Chana Dal : चण्याची डाळ खा आणि चमत्कारिक फायदे मिळवा; आजच आहारात समावेश करा

Anita Date : ‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम अनिता दातेने खरेदी केली नवी कोरी गाडी; अभिनेत्रीवर होतोय कौतुकाचा वर्षाव

SCROLL FOR NEXT