Ajit Pawar  Saam TV
महाराष्ट्र

Ajit Pawar : ... म्हणून सोशल मीडियावरील राष्ट्रवादीचा फोटो हटवला; अजित पवारांनी सांगितलं कारण

NCP Logo : सर्वांमध्ये अजित पवार यांनी स्वत: माध्यमांसमोर येत आपली प्रतिक्रिया दिली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Political News : राज्यात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अजित पवारांविषयी वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.अजित पवारांच्या हालचालींवरून राज्यात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप येणार असं म्हटलं जात आहे. या चर्चे दरम्यान अजित पवार यांच्या ट्वीटर अकाउंटवरील राष्ट्रवादीचा फोटो गायब झाला. त्यामुळे राजकीय भूकंपाच्या चर्चांना आणखी वेग आला. अशात या सर्वांमध्ये अजित पवार यांनी स्वत: माध्यमांसमोर येत आपली प्रतिक्रिया दिली आहे. (Marathi News)

सोशल मीडियावर अजित पवारांनी राष्ट्रवादीचा फोटो काढल्याने साऱ्यांच्याच भूवया उंचावल्या. अजित पवार हे आता भाजपमध्ये प्रवेश करणार का? अशा चर्चा सुरू झाल्या. या चर्चांवर अजित पवारांनी प्रतिक्रिया देत फोटोचा खुलासा केला आहे. राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसळले तेव्हाच मी राष्ट्रवादीचा फोटो आणि उपमुख्यमंत्री पद हटवलं होतं. तुम्ही उगीच माझ्या बोलण्यात ध चा म करू नका, असं अजित पवारांनी यावेळी म्हटलं आहे.

तसेच सध्या सुरु असलेल्या चर्चेवर अजित पवार पुढे म्हणाले की, 40 आमदारांच्या सह्या कुणीही घेतल्या नाही. सही घेण्याचं काहीही कारण नाही. या बातम्यांना काहीही आधार नाही. कुणी काय मत व्यक्त करावं हा त्यांचा अधिकार आहे. अनेक आमदार कामानिमित्त येत असतात. आजही नेहमीप्रमाणे आमदार भेटायला आले होते. आमदारांची वेगवेगळी कामं होती, असं अजित पवार यांनी स्पष्ट केले.

अजित पवारांचा संजय राऊतांवर नाव न घेता टोला

अजित पवार हे भाजपसोबत जाण्याच्या वावड्या असल्याचं खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटलं होतं. मात्र, अजित पवार यांनी आमच्या पक्षाचे वकीलपत्र घेऊ नये, म्हणत संजय राऊतांना नाव न घेता टोला लगावला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

दांडिया सुरू असताना कॉलेजमध्ये अनर्थ! लोखंडी सांगाडा कोसळून तरुणीचा मृत्यू, १७ विद्यार्थी जखमी, हादरवणारा व्हिडीओ

Nagpur Fort : विदर्भाची काशी! नदीच्या काठावर वसलाय ऐतिहासिक खजिना, सुट्टीत करा 'या' किल्ल्यावर भटकंती

Bigg Boss 20 : बिग बॉसमध्ये मोठा ट्विस्ट! अचानक बाजी पलटली, 'या' स्पर्धकाचा पत्ता कट

Morning Walk Benefits: रोज सकाळी काही मिनिटं मारा फेरफटका, होतील 6 आश्चर्यकारक बदल

SCROLL FOR NEXT