Sanjay Raut Latest News Saam Tv
महाराष्ट्र

Sanjay Raut: आताची शिवसेना ही पाकिट मारी; संजय राऊतांचा शिंदे गटावर घणाघात

Sanjay Raut News: तिघांमध्ये जागावाटप कसं होणार यावरून चर्चा सुरू आहेत. अशात खासदार संजय राऊतांनी जागावाटपांच्या चर्चेवरून भाजपसह शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

Ruchika Jadhav

मयुर राणे

Political News:

राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष कामाला लागल्याचे दिसत आहेत. जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी साऱ्यांनीच कंबर कसलीये. अशात महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजप असे तीन पक्ष आहेत. यात शिंदे गट कमळावर निवडणूक लढणार अशा चर्चा काही दिवसांपूर्वी रंगल्या होत्या. तसेच या तिघांमध्ये जागावाटप कसं होणार यावरून चर्चा सुरू आहेत. अशात खासदार संजय राऊतांनी जागावाटपाच्या चर्चेवरून भाजपसह शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

आताची शिवसेना ही पाकिट मारी आहे. दुसऱ्याचं पाकिट मारायचं आणि आपल्या खिशात ठेवायचा अशी शिवसेना फार काळ टिकणार नाही, अशा शब्दांत संजय राऊतांनी शिंदे गटावर घणाघात केलाय.

शिंदे गट निवडणूक लढणार ते सुद्धा कमळ चिन्हावर असं मी ऐकलं आहे. मुळात ती शिवसेना नाही. हा ओढून ताणून केलेला प्रकार आहे. ही शिवसेना कशी असू शकते? शिवसेना इकडे आहे आम्ही २३ जागा लढत आहे. या आधी सुद्धा लढलो आहे आणि यानंतरही लढू ही खरी शिवसेना आहे, अशा शब्दांत राऊतांनी एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र सोडलंय.

शिंदे गटाच्या जागा कोणी लढायच्या हे मुंबईतले भांडवलदार ठरवतील. मुंबईतले भांडवलदार आणि गुजरातचे उद्योगपती ठरवणार की मुंबईत लोकसभा शिंदे गटाकडून कोणी लढायचं हे तुम्ही लिहून घ्या, असा दावाही राऊतांनी यावेळी केला.

काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जनता न्यायालयाचं आयोजन केलं होतं. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आदेश कसे पायदळी तुडवले असा दावा करत त्यांनी विविध पुरावे सादर केले. यावर नार्वेकरांनी आम्हला हे पुरावे देण्यात आले नव्हते असं म्हटलं. त्यावरूनही आज राऊतांनी नार्वेकरांवर निशाणा साधला आहे.

त्यांना मला सांगायचं आहे आपण वकील आहात आणि देवेंद्र फडणवीस देखील वकील आहेत दोन वकिलांनी एकत्र बसावं आणि एकदा काय ते ठरवावं. लग्न एकदा होतं प्रत्येक लग्नाची एनिवर्सरी जी असते त्याला सर्टिफिकेट दाखवावं लागत नाही, अशा शब्दांत राऊतांनी नार्वेकरांवर टीकास्त्र सोडलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Municipal Corporations Election: महापालिकांवर कब्जा, त्याचा मंत्रालयावर झेंडा, 9 महापालिका ठरवणार राज्याचा 'किंगमेकर'

Uddhav- Raj Alliance: ठाकरेंच्या युतीचा मुहूर्त ठरला; भाजप-शिंदेसेनेला टक्कर देण्यासाठी ठाकरे बंधुंची रणनीती काय?

Fact Check : तुमचं व्हॉट्सअॅप हॅक होतंय? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य? VIDEO

शिक्षक भरती घोटाळा: आणखी एका शिक्षणाधिकाऱ्याला अटक; 12 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप

kolhapur Politics : कोल्हापूर महापालिकेसाठी सतेज पाटलांनी ठोकला शड्डू; यंदा केली नव्या टॅगलाईनची घोषणा

SCROLL FOR NEXT