Sanjay Raut Saam TV
महाराष्ट्र

Sanjay Raut : संजय राऊतांची ईडी, सीबीआयकडे धाव; श्रीकांत शिंदे फाऊंडेशनविरोधात उद्या तक्रार दाखल करणार

Sanjay Raut News : बेइमानी काय आहे हे तुम्ही आता पहा, श्रीकांत शिंदे फाउंडेशन ही महाराष्ट्रात चाललेली सगळ्यात मोठी बेइमानी आहे ही फक्त सुरुवात आहे, अशी जहरी टीका देखील राऊतांनी यावेळी केली.

Ruchika Jadhav

श्रीकांत शिंदे यांच्या खात्यामध्ये गेल्या काही वर्षात 40 ते 50 लाखांची उलाढाल झालीये. पण त्यांनी खर्च कमी दाखवला आहे. मात्र त्यांच्या घोषणा या काही कोटींमध्ये आहेत. फाउंडेशनच्या माध्यमातून रोखेत पैसे वळवायचे आणि हा पैसा राजकारणात वापरायचा, अशा शब्दांत खासदार संजय राऊतांनी श्रीकांत शिंदे फाऊंडेशनवरून निशाणा साधत आरोप केले आहेत.

ईडी आणि सीबीआयकडे तक्रार करणार

संजय राऊतांनी श्रीकांत शिंदे फाऊंडेशनवर ४० ते ५० लाखांची उलाढाल केल्याचा आरोप करत याबाबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. तसेच उद्या या प्रकरणी ते ईडी आणि सीबीआयकडे रीतसर तक्रार नोंदविण्याचा प्रयत्न करणार आहेत, असं राऊतांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितलं.

महाराष्ट्रातील सर्वात मोठी बेइमानी

पुढे श्रीकांत शिंदेंचा बाळराजे असा उल्लेख करत त्यांच्या फाउंडेशनसाठी आतापर्यंत कोट्यावधी रुपये खर्च झाले आहेत. ते सरकारचे बाळराजे आहेत. चंदा दो धंदा लो याच माध्यमातून हे पैसे गोळा करत आहेत. बेइमानी काय आहे हे तुम्ही आता पहा, श्रीकांत शिंदे फाउंडेशन ही महाराष्ट्रात चाललेली सगळ्यात मोठी बेइमानी आहे ही फक्त सुरुवात आहे, अशी जहरी टीका देखील राऊतांनी यावेळी केली.

जाहीरनाम्यावर टीका

पुढे भाजपच्या जाहिरनाम्यावरून बोलताना राऊत म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून मी सातत्याने प्रधानमंत्री मोदी यांची महाराष्ट्रात भाषण ऐकवतो आहे. मोदींबरोबरचे जे मित्रपक्ष आहेत त्यांची भाषणे देखील ऐकत आहे. मोदींची गॅरंटी हा जाहीरनामा प्रसिद्ध झाला तो देखील मी पाहिला आहे. प्रत्येक जाहीरनाम्यात भ्रष्टाचार करणाऱ्या व्यक्तींचा समूळ उच्चाटन करून असं लिहिल आहे, गेल्या दीड दोन वर्षात सगळे भ्रष्टाचारी लोक मोदींनी आपल्या पक्षात घेतले.", अशा शब्दांत राऊतांनी जाहीरनाम्यावरून टीकास्त्र सोडलं आहे.

हे ढोंग आहे तरीदेखील आम्ही प्रधानमंत्र्यांवर विश्वास ठेवतो. निवडणूक वृक्ष घोटाळा हा या विश्वातला सगळ्यात भयंकर घोटाळा आहे. अनेक ठेकेदार, दारूवाले, कंत्राटदार यांना हजारो कोटींची कामे द्यायची आणि त्या बदल्यात निवडणूक रोखे माध्यमातून भाजपाच्या निधीमध्ये हजारो कोटी रुपये जमा करायचे, हा गोरख धंदा भाजपने सुरू केलाय. कुठल्याच व्यवहारात पारदर्शकता नाही. पीएमकेअर फंडाचा हिशोब नाही. तो खाजगी ट्रस्ट आहे पण सरकारी असल्याचा दाखवून कोटी रुपये गोळा केले जातायत, असंही राऊत यावेळी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Methi chi bhaji recipe: गावरान स्टाईल मेथीची सुकी भाजी कशी बनवायची?

डॉक्टर की गुंड? उपचार घेणाऱ्या रुग्णाला डॉक्टरकडून मारझोड, इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजमधील धक्कादायक प्रकार

IAS Officers Transferred: ऐन निवडणुकीत राज्यातील तीन IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, जाणून घ्या कोणाची कुठे झाली बदली?

Dombivali: डोंबिवलीतील फडके रोडवरील धक्कादायक घटना; टेरेसची भिंत कोसळली

मुंबईत वंचित-काँग्रेस साथ साथ? आघाडीच्या चर्चेसाठी संयुक्त समिती?

SCROLL FOR NEXT