Sanjay Raut: भ्रष्टाचारासंदर्भात भाजपच्या लोकांची थेट पंतप्रधान मोदींकडे तक्रार?

Sanjay Raut : महाराष्ट्रात चंदा दो, धंदा लो सुरू आहे काय? भाजपचे काही लोक महाराष्ट्रात असा प्रकार करत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाय.
Sanjay Raut: भ्रष्टाचारासंदर्भात भाजपच्या लोकांची थेट पंतप्रधान मोदींकडे तक्रार?

Sanjay Raut Complaint To PM Modi : ना खाऊंगा ना खाने दूंगा' का क्या हुआ असं म्हणत देशाच्या सत्तेवर पंतप्रधान मोदी आलेत. भ्रष्टाचाऱ्यांना चाप लावणार असा दावा पंतप्रधान मोदी करत होते. परंतु आता भाजपमधील नेतेच भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप केला जात आहे. संजय राऊत यांनी ट्विटच्या माध्यमातून थेट पंतप्रधान मोदींकडे तक्रार केलीय.

महाराष्ट्रातील भाजपमधील नेते भ्रष्टाचार करत असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाय. संजय राऊत यांनी या नेत्यांची तक्रार थेट पंतप्रधान मोदींनीकडेच केलीय. राज्यात चंदा दो धंदा लो असा धंदा भाजप नेत्यांकडून केला जात आहे. पंतप्रधान मोदींना भ्रष्टाचार मुळापासून मिटवायचे आहे. परंतु भाजप नेतेच भ्रष्टाचार करत असल्याचं संजय राऊत आपले ट्विटमध्ये म्हणालेत.

काय आहे संजय राऊत यांचे ट्विट

चंदा दो धंदा लो!

हा गोरख धंदा महाराष्ट्रातदेखील

सुरु आहे काय?

एकदमजोरांत!

पंतप्रधान श्रीमान नरेंद्र मोदी यांना

भ्रष्टाचाराचे समुळउच्चाटन करायचे आहे.

लेकीन उनकेही लोग ये होने नहीं देते.

मी मोदीजींना एक तक्रार केली आहे.

wait and watch !!

काही दिवसापूर्वी पंतप्रधान मोदींनी प्रचार सभेत बोलताना राहुल गांधी आणि लालू प्रसाद यादव यांच्यावर मटण पार्टीवरून टीका केली होती. त्याला ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींना सडेतोड उत्तर दिलं होतं. भ्रष्टाचाराचं.. खाण्यापेक्षा मटण खाल्लं बरं असं म्हटलं होतं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com