Ramdas Kadam targets Uddhav Thackeray saamt tv
महाराष्ट्र

Ramdas Kadam: मुख्यमंत्र्यांची जीभ हासडण्याची हिंमत आहे का? रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

पुढचा आमदार योगेश कदमचं असेल असा दावा रामदास कदम यांनी यावेळी केला.

साम टिव्ही ब्युरो

जितेश कोळी

रत्नागिरी : शिवसेना नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर आज पत्रकार परिषदे घेऊन त्यांचा समाचार घेतला आहे. शिवसेनेसाठी कोणतेही योगदान नसलेले उद्धव ठाकरे हे संजय कदम सारख्या चीनपाटच्या प्रवेशासाठी खेडला येतात आणि लोकांना भावनिक आवाहन करतात.

उद्धवजी तुम्ही एकदा नाही शंभर वेळा खेडला आलात तरी पुढचा आमदार योगेश कदमचं असेल असा दावा रामदास कदम यांनी यावेळी केला. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी बेईमानी तुम्ही केली. बाळासाहेब असते तर राष्ट्रवादी व काँग्रेसच्या सोबत जाऊन तुम्हाला मुख्यमंत्री होता आले असते का? असा सवाल देखील रामदास कदम यांनी यावेळी उपस्थित केला.  (Maharashtra Politics)

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून बोलताना, आम्हाला देशद्रोही म्हणाल तर जीभ हासडून टाकू असं म्हटलं होतं. मुख्यमंत्र्यांची जीभ हसडण्याची भाषा करता, हिंमत आहे का? असा प्रतिसवालही रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावर केला. तसेच येत्या 19 मार्च रोजी खेडमध्ये सभा घेणार असल्याचीही माहिती त्यांनी यावेळी दिली.

भास्कर जाधवने आधी शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसून राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर राष्ट्रवादीच्या पाठीत खंजीर खुपसून शिवसेनेत प्रवेश केला. उद्धवजींना खुश करण्यासाठी भास्कर जाधव हा बेईमान बाटगा भुंकत असल्याची टीका रामदास कदम यांनी यावेळी केली.

कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आम्ही बनवला आहे, तुम्ही पक्षासाठी काय योगदान दिले असा सवाल देखील रामदास कदम यांनी उपस्थित केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याचे दर ऐतिहासिक उच्चांक गाठणार! प्रति तोळा २ लाखांच्या पार जाणार? वाचा

Youtuber Death: प्रसिद्ध युट्यूबरचा वयाच्या ३१ व्या वर्षी संशयास्पद मृत्यू; जंगलात आढळला मृतदेह, मनोरंजन सृष्टीत खळबळ

Russian model viral video: जवळ आला, हात लावण्याचा प्रयत्न केला आणि...! लगट करणाऱ्याला रशियन महिलेने शिकवला धडा

Messy Braid Hairstyle For Long Hair: लांब केसांवर शोभून दिसेल 'मेसी वेणी', लग्नात तुम्हीच दिसाल सुंदर

Instagram Down : अचानक इंस्टाग्राम झालं ठप्प, रील प्रेमींचा जीव टांगणीला, भन्नाट मीम्सचा पाऊस

SCROLL FOR NEXT