Raju Shetti News
Raju Shetti News Saam Tv
महाराष्ट्र

Raju Shetti News: हातकणंगले लोकसभा स्वतंत्रपणे लढवणार; राजू शेट्टी यांची घोषणा

Shivani Tichkule

रणजीत माजगावकर

Raju Shetti News Today: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी आगामी लोकसभेसाठी रणशिंग फुंकले आहेत. त्यांनी स्वतः हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून उतरण्याची घोषणा केली आहे. (Latest Marathi News)

त्याचबरोबर राज्यात सहा ठिकाणी उमेदवार देणार असल्याचे राजू शेट्टी म्हणाले. राजू शेट्टी यांनी ही निवडणूक (Election) पूर्ण ताकदीने लढवणार असल्याचे म्हटले आहे. कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपली रणनीती स्पष्ट केली.

"पराभवाने मी खचून जाणारा माणूस नाही"

हातकणंगले लोकसभा निवडणूक मी जनतेच्या पाठिंब्यावर आणि लोकवर्गणीतून लढवणार आहे. स्वतंत्रपणे ही निवडणूक लढवणार आहे. आम्ही पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार आहोत. लोकसभा निवडणुकीत 2019 मध्ये गाफील राहिल्याने पराभव झाला. संघर्ष केला असतानाही पराभव झाला. मात्र, पराभवाने मी खचून जाणारा माणूस नाही. लोकसभेच्या सहा जागा लढवणार असल्याचे सांगितले. त्या जागांवर उमेदवारी जाहीर करणार असल्याचेही राजू शेट्टी (Raju Shetti) म्हणाले.

"आम्ही महाविकास आघाडीचा घटक पक्ष नाही"

पुढे बोलताना राजू शेट्टी यांनी सांगितले की, समोर कोण आहे, कोणता पक्ष आहे हे आम्ही बघणार नाही. मला शेतकरी आणि सर्वसामान्यांचे प्रश्न मांडायचे आहेत. यासाठीच मी लोकसभेच्या मैदानात उतरणार आहे. महाविकास आघाडीमधून आम्ही आता गेल्यवर्षीच बाहेर पडलो आहे. आम्ही महाविकास आघाडीचा घटक पक्ष नाही. असंही त्यांनी यावेळी सांगितले. (Political News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yoga Tips: योगा करताना 'या' चुका टाळा अन्यथा होतील गंभीर परिणाम

Prasad Khandekar Birthday : 'पश्या खूप मोठा हो, यशाचे शिखरं गाठ...' नम्रता संभेरावने दिल्या प्रसाद खांडेकरला वाढदिवसाच्या शुभेच्छा

Pune News: धक्कादायक! क्रिकेट खेळताना गुंप्तांगावर मार लागल्याने चिमुकल्याचा मृत्यू, पुण्यातील घटना

Today's Marathi News Live : नवी मुंबईत शिवसेना मनसेची नियोजन बैठक संपन्न

Dehydration Treatment : 'या' ज्यूसचे सेवन केल्याने रखरखत्या उन्हात डीहायड्रेशनपासून राहाल दूर

SCROLL FOR NEXT