Political News  Saam TV
महाराष्ट्र

Swatantraveer Gaurav Din: CM शिंदेंची मोठी घोषणा; स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त महत्वाचा निर्णय

साम टिव्ही ब्युरो

CM Eknath Shinde Announced: स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती २८ मे रोजी साजरी केली जाते. अशात राज्यात हा दिवस 'स्वातंत्र्यवीर गौरव दिन' म्हणून साजरा केला जाणार, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. वीर सावरकरांचे विचार सर्वांपर्यंत पोहचवण्यासाठी या दिवशी सावरकरांच्या जिवनावर आधारित विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. (Marathi News)

उद्योगमंत्री उदय सामंत यांची मागणी पूर्ण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून या विषयी माहिती दिली आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी, राष्ट्रउन्नतीसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे मोठे योगदान आहे. त्यांची देशभक्ती, धैर्य, प्रगतीशील विचारांना पुढे नेण्यासाठी, त्यामाध्यमातून त्यांना अभिवादन करण्यासाठी ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ साजरा करण्याची मागणी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली होती.

राहुल गांधींच्या वक्तव्यानंतर मोठं वादळ

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वीर सावरकरांवर केलेल्या वक्तव्याने राज्याचे राजकारण तापले होते. मी घाबरत नाही कारण, मी गांधी आहे सावरकर नाही. असं विधान राहुल गांधी यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारने राहुल गांधींवर मोठा हल्लाबोल केला.

स्वातंत्र्यवीर सावरकरांवर (Swatantra veer Savarkar) केलेल्या वक्तव्यानंतर राज्यात जनतेला सावरकरांचे विचार आणि त्यांचे कार्य याची संपूर्ण माहिती मिळावी यासाठी शिंदे-भाजप सरकारने प्रयत्न केले. यावेळी त्यांनी गौरव यात्रा देखील काढली होती. त्यानंतर आता २८ मे हा दिवस 'स्वातंत्र्यवीर गौरव दिन' म्हणून साजरा करण्याचे जाहीर करण्यात आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rohit sharma: होय..माझा 'तो' निर्णय चुकला! रोहित शर्माने का मागितली माफी?

Bus Accident : घाट रस्त्यात बसचा अपघात; विद्यार्थ्यांसह ४० प्रवाशी जखमी

Maharashtra Politics: पुणे, सोलापूर ते लातूर, संगमनेर; काँग्रेसची उमेदवारी यादी रवींद्र धंगेकरांनी टाकली अन् डिलीट केली

Maharashtra News Live Updates: पपई पिकावर मोझॅक रोगाच्या प्रादुर्भाव, शेतकरी हवालदिल

Poha Chivda: दिवाळीसाठी घरी खमंग अन् कुरकुरीत बनवा पोह्यांचा चिवडा

SCROLL FOR NEXT