Mla Bacchu Kadu
Mla Bacchu Kadu  Saam Tv
महाराष्ट्र

Bachchu Kadu: बच्चू कडूंनाही व्हायचंय मुख्यमंत्री,जाहीर सभेत स्वत: सांगितली मनातली इच्छा, पहा व्हिडिओ

Ruchika Jadhav

Political News : प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. शिंदे आणि फडणवीस सरकारमध्ये अद्यापही त्यांच्या पदरी काहीच नसल्याने ते नाराज असल्याचं म्हटलं जात आहे. तसेच विरोधी पक्षाकडून सत्ताधारी शिवसेना आणि इतर बंडखोर नेत्यांना गद्दार म्हटलं जात आहे. या सर्वांवर आता बच्चू कडू यांना नेमकं काय वाटतं हे त्यांनी स्वत: एका जाहीर सभेतून सांगितलं आहे. (Latest Bacchu Kadu News)

अमरावतीत एका कार्यक्रमात बच्चू कडू यांनी आपल्या मनातली इच्छा व्यक्त करत आम्हाला देखील मुख्यमंत्री व्हायचं आहे, असं म्हटलय. उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी म्हटलं की, 'प्रहार आपला स्वतःचा पक्ष आहे आपल्या मातीतला आपण निर्माण केलेला पक्ष आहे. लोक आम्हाला म्हणतात, गद्दारी का केली. आम्ही काही गद्दारी केली नाही, आम्हालाही मुख्यमंत्री बनायचं आहे, असं वक्तव्य आमदार बच्चू कडू यांनी अमरावतीत केलं.

यापूर्वी सुद्धा बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री बनण्याची इच्छा व्यक्त केली होती. आता पुन्हा एकदा बच्चू कडू यांनी थेट मुख्यमंत्री पदावरच आपला दावा केला असून आपली इच्छा मुख्यमंत्री बनण्याची आहे, असं त्यांनी यावेळी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्याने राजकीय वतृळात चर्चेला उधान आलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Desi Jugad Viral Video: जबरदस्त देसी जुगाड! कारमध्येच लावली ऊसाच्या रसाची मशीन, VIDEO ची होतेय चर्चा

Viral Video: स्केटिंग करताना हिरोगिरी करणं पडलं महागात, तरुणाचे झाले असे हाल; थरकाप उडवणारा VIDEO व्हायरल

kalyan Crime News : लग्नाला दिलेला नकार पोराला पचला नाही, रागाच्या भरात नको ते करून बसला!

Madhurani Gokhale : ‘आई कुठे काय करते’तल्या ‘अरुंधती’चं निस्सिम सौंदर्य

PM Modi Property: पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदींच्या संपत्तीत किती झाली वाढ? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT