जालना शहर महानगरपालिकेत राजकीय भूकंप
काँग्रेस पक्षाच्या 7 नगरसेवकांच पक्षाकडून निलंबन
गटनेते फारूक तूंडीवाले यांच्यासह 7 जणांच निलंबन
स्वीकृत सदस्य निवडीच्या वेळी भाजपला उघडपणे मदत केल्याचा ठपका
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशावरून 7 सदस्यांचं निलंबन
अक्षय शिंदे, साम टीव्ही
जालना शहर महानगरपालिकेच्या राजकारणात भूकंप झाला आहे. काँग्रेस पक्षाच्या 7 नगरसेवकांचं प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार निलंबन करण्यात आलं आहे. यात गटनेता फारूक तूंडीवाले यांच्या नावाचा देखील समावेश आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आल्याची माहिती प्रदेश उपाध्यक्ष संघटन आणि प्रशासन अॅड. गणेश पाटील यांनी दिली आहे.
जालना शहर महानगरपालिकेच्या स्वीकृत सदस्यपदाची निवड दोन मार्च रोजी झाली होती. या निवडीवेळी काँग्रेस पक्षाचे महापालिकेतील गटनेते फारूक तूंडीवाले यांनी भाजपतर्फे निवडणूक लढवलेल्या उमेदवाराच्या नावाची शिफारस केली होती. त्यामुळे या सदस्यांनी पालिकेतील स्वीकृत सदस्य नियुक्ती करताना भारतीय जनता पक्षाला उघडपणे मदत केली. यावरून पक्ष शिस्तीचा भंग केल्याचा ठपका ठेवत काँग्रेसकडून ७ नगरसेवकांना निलंबित करण्यात आलंय.
काँग्रेस पक्षाने कारवाई करताना जाहीर केलं की, 'जालना महानगरपालिका सदस्यांनी जालना महानगरपालिकेत स्वीकृत सदस्य नियुक्ती करताना भाजपला उघडपणे मदत करत पक्षशिस्तीचा भंग केला, असे चौकशी अहवालावरून स्पष्ट झालंय. यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशावरून ७ सदस्यांना काँग्रेस पक्षातून पुढील आदेशापर्यंत निलंबीत करण्यात येत आहे.
कोणाकोणाला निलंबन केलं?
१. फरूक सादीक तुंडीवाले
२. इम्रान खान आमानुलला खान
३. फरहाना अ. रऊफ अंसारी
४. सुनिल अशोक बोरडे
५. मयूरी दिनेश वेने
६. रुबीना मजीद पठाण
७. अनिल अशोक तिरुखे
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.