eknath shinde vs uddhav thackeray  Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंकडून शिंदेसेनेचं 'एसंशि' नामकरण; उपमुख्यमंत्री शिंदेंचा पलटवार, म्हणाले, UT म्हणजे...

Maharashtra Political News : वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर झालं.मात्र या निमित्तानं राज्यातलं राजकारण चांगलंच तापलंय. या निमित्तानं उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंवर टीकेची झोड उठवलीये. मात्र ही टीका शिंदेंच्या चांगलीच जिव्हारी लागलीये.त्याला प्रत्युत्तर देत शिंदेंनीही उद्धव ठाकरेंवर पलटवार केलाय. पाहूया...

Tanmay Tillu

गेल्या तीन-चार दिवसांपासून उद्धव ठाकरेंनी शिंदेंच्या शिवसेनेला शिवसेना म्हणणेच योग्य नाही, ती गद्दारांची सेना आहे, असं म्हणत शिंदे सेनेला एक नवीन नाव दिलय. सातत्यानं शिंदे गटावर हल्लाबोल करणाऱ्या उद्धव ठाकरेंनी आता शिंदे गटाला केवळ गद्दार नाही तर एसंशिं म्हणण्यास सुरुवात केलीये..ज्यामुळे राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला तोंड फुटलंय. उद्धव ठाकरे यांनी 'एसंशि' असा जो उच्चार केला आहे. त्यावरून आता दोन्ही शिवसेनेत नवा वाद सुरू झालाय आणि त्यावर आता थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही पलटवार केलाय.

2022 मध्ये शिंदे यांनी बंड करून शिवसेनेत फूट घडवून आणली आणि भाजपसोबत युती करत सत्ता स्थापन केली होती. तेव्हापासून उद्धव ठाकरे आणि शिंदे गटात सातत्याने शाब्दिक चकमकी होत आहेत. ठाकरे यांनी यापूर्वीही शिंदे गटाला ‘गद्दार सेना’ संबोधलं होतं.मात्र आता थेट एसंशिं म्हणत ठाकरेंनी शिंदेंना ललकारलंय.

उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्याने शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यातील वाद आता आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. तर उद्धव ठाकरेंना कायम उबाठा असे डिवचणाऱ्यांना आता एसंशि हा शब्दप्रयोग बोचायला लागला आहे. या नव्या नावामुळे शिवसेना कोणाची हा जुनाच वाद नव्याने सुरु झाला आहे. त्यामुळे एसंशि विरुद्ध युटी हा वाद कुठपर्यंत जाणार? याकडे लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT