raj thackray news Saam tv
महाराष्ट्र

राज ठाकरे इंडिया आघाडीत जाणार? उद्धव ठाकरेंसोबत शिवतीर्थावर चर्चा?

Sanjay raut on raj thackeray : खासदार संजय राऊत यांनी राज ठाकरेंबाबत मोठं विधान केलंय. त्यानंतर काही तासांतच उद्धव ठाकरेंनी शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरेंची भेट घेतलीय. महापालिका निवडणुकीनंतर पहिल्यांदाच होत असलेल्या या भेटीत इंडिया नेमकी काय चर्चा झाली? राऊतांनी नेमके काय संकेत दिले? यावरचा हा रिपोर्ट...

Snehil Shivaji

आमदार, खासदार, नगरसेवक जरी नसले तरी राजकारणात दबदबा कायम ठेवणारे राज ठाकरे आता इंडिया आघाडीत जाणार का याची जोरदार चर्चा सुरू झालीय. त्याला कारण ठरलंय इंडिया आघाडीची दिल्लीतली बैठक. इंडिया आघाडीच्या बैठकीत २५ पक्षांचे प्रमुख उपस्थित होते. पण या बैठकीच्या निमित्तानं राज ठाकरे इंडिया आघाडीत सामील होणार असल्याची चर्चा वाऱ्यासारखी पसरली. या चर्चेला हवा दिली, ती ठाकरे गटाच्या नेत्यांनी केलेल्या या एका विधानानं.

राजकारणात टायमिंगला महत्व असतं हे आपल्याला माहितीचेय. त्यामुळे संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर मुंबईत ज्या पॉवरफुल घडामोडी घडल्या,त्यामागची ही क्रोनोलॉजी समजून घेणं गरजेचं आहे.

ठाकरे बंधूंची भेट, नवं राजकीय समीकरण?

सकाळी 10 वा. - संजय राऊतांचं पत्रकार परिषदेत राज ठाकरेंबाबत मोठं विधान

दु. 12 वा. - उद्धव ठाकरेंचा इंडिया आघाडीच्या बैठकीत ऑनलाईन सहभाग

दु. 12.50 वा. - रश्मी ठाकरे थेट राज ठाकरेंच्या निवासस्थानी दाखल

दु. 1.00 वा. इंडिया आघाडीची बैठक सुरू असताना भाजप आमदार प्रसाद लाड शिवतीर्थावर दाखल

दु. 1.20 वा. - इंडिया आघाडीची बैठक संपवून उद्धव ठाकरेही शिवतीर्थावर

सध्या सेना-मनसेची युती असून, महापालिका निवडणुकीपासूनच ठाकरे गट यासाठी सकारात्मक होता. पण राज ठाकरेंचा इंडिया आघाडीतला प्रवेश म्हणावा तितका सोपा नक्कीच नाही. कारण, काँग्रेसचा राज ठाकरेंना टोकाचा विरोध आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत राज ठाकरेंसोबत ठाकरेंनी युती केल्यानंतर काँग्रेसने ठाकरेंसोबतची आघाडी तोडली होती. त्यामुळे राज ठाकरेंसाठी इंडिया आघाडीची वाट ही नक्कीच रेड कार्पेटची नाही.

इंडिया आघाडीतील राज यांचा सहभाग जितका लांबेल तितकं ते भाजपच्या पथ्यावर पडणार, यात शंका नाही. आणि म्हणूनच प्रसाद लाड, उद्धव ठाकरेंचे शिवतीर्थावर जाणं, या घडामोडींवरुन महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे एखादं नवं समीकरण आकार घेतंय का अशीही चर्चा या निमित्तानं सुरू झालीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Daily Horoscope : ५ राशींवर भोलेनाथांची कृपा! प्रचंड पैसा मिळणार अन् मोठे यश; वाचा सोमवारचे राशिभविष्य

पुण्यात धक्कादायक प्रकार! 12 लाखांची फूड टेस्टिंग मशीनच झाली गायब; आरोग्य विभागाचा गलथान कारभार?

Viral Video : उंदरांनी कुरतडलेली फळे विक्रीला? व्हायरल व्हिडिओने मुंबईकरांमध्ये खळबळ

फिफा वर्ल्डकप 2026चा 'ग्रँड फिनाले', स्पेनसमोर मेस्सीच्या अर्जेंटिनाचं तगडं आव्हान

सोनम वांगचुक यांचा रुग्णालयातून संदेश, 20 जुलैला भारताचं दुसरं स्वातंत्र्य आंदोलन, मोदी सरकारचं टेंशन वाढलं

SCROLL FOR NEXT