Samruddhi Mahamarg Accident News Saam Tv
महाराष्ट्र

Accident News: समृद्धी महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच; ट्रकला धडकून पोलीस वाहन चक्काचूर; महिला पोलीस निरीक्षकाचा मृत्यू

Wardha Accident News: परभणी येथून आरोपी घेऊन नागपूर येथे जाणारे हरियाणा राज्यातील पंचकुला येथील पोलिसांचे पोलीस वाहन ट्रकला मागून धडकल्याने भीषण अपघात झाला.

Shivani Tichkule

चेतन व्यास, वर्धा

Samruddhi Mahamarg Accident News: परभणी येथून आरोपी घेऊन नागपूर येथे जाणारे हरियाणा राज्यातील पंचकुला येथील पोलिसांचे पोलीस वाहन ट्रकला मागून धडकल्याने भीषण अपघात झाला. समृद्धी महामार्गावर पांढरकवढा गावानजीक सकाळ दरम्यान ही घटना घडली. (Latest Marathi News)

अपघातात (Accident) महिला पोलीस निरीक्षकाचा मृत्यू झाला आहे तर तीन कर्मचारी आणि आरोपी गंभीर जखमी झाला आहे. पोलीस निरीक्षक नेहा चव्हाण असे मृतकाचे नाव आहे. तर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुखविंद्रसिंह, मिठ्ठू जगडा, चालक शम्मी कुमार आणि आरोपी वैद्यनाथ शिंदे हे गंभीर जखमी झाले. सर्व जखमींवर सावंगी येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आल्याची माहिती सावंगी पोलिसांनी दिली.

हरीयाणा येथील पंचकुला पोलीस (Police) ठाण्यातील पोलीस निरीक्षक नेहा चव्हाण आणि त्यांचे तीन कर्मचारी परभणी येथून फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपी वैद्यनाथ शिंदे याला घेऊन पोलीस वाहनाने नागपूरच्या दिशेने जात होत्या. समृद्धी महामार्गाने जात असताना पांढरकवडा गाव परिसरात पोलीस वाहन समोरील ट्रकला मागाहून धडकले.

या भीषण अपघातात (Accident) पोलीस वाहनाचा समोरील भाग चेंदामेंदा झाला. या अपघातात पोलीस निरीक्षक नेहा चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला तर पोलीस कर्मचारी व आरोपी गंभीर जखमी झाले. (Samruddhi Mahamarg Accident)

अपघाताची माहिती मिळताच सावंगी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनाजी जळक, संदीप खरात हे कर्मचाऱ्यांसह अपघातस्थळी दाखल झाले. तसेच जाम महामार्ग पोलीसही अपघातस्थळी दाखल झाले. सर्व जखमींना तत्काळ सावंगी येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. तसेच आरोपी ट्रकचालकास पोलिसांनी अटक केली. (Wardha News)

घटनास्थळी जातं सावंगी पोलिसांनी अपघातग्रस्त पोलीस वाहन ताब्यात घेतले आहे. तसेच पोलीस अधिकाऱ्याकडे असलेली १ ग्लॉक ९ एमएम पीस्टल आणि १५ राऊंड सुरक्षितरित्या ताब्यात घेतल्याची माहिती पोलिस निरीक्षक धनाजी जळक यांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahul Gandhi Relief : राहुल गांधींना मोठा दिलासा, नाशिकमधील 'तो' खटला बंद, कोर्टात काय घडलं?

LPG Rules Update : वर्षभरात तुम्ही किती गॅस सिलिंडर खरेदी करू शकता? वाचा नियम काय सांगतो

घरगुती गॅस पुरवठ्याबाबत हायकोर्टानं दिला महत्वाचा आदेश, केंद्र सरकारलाही धाडली नोटीस

रायगडच्या राजकारणात अनपेक्षित घडामोडी, जिल्हा परिषद वादावर कसा पडला पडदा?

Esakal No.1: ई-सकाळचा डिजिटल डंका; कॉमस्कोरमध्ये अव्वल स्थान पटकावलं

SCROLL FOR NEXT