police seized 25 lakhs from a car in chandrapur
police seized 25 lakhs from a car in chandrapur  saam tv
महाराष्ट्र

Chandrapur : बल्लारपूरहून नागपूरला जाणारी कार चंद्रपूर पाेलिसांनी तपासली, 25 लाखाची रक्कम जप्त

संजय तुमराम

Chandrapur :

आगामी काळात हाेणा-या लोकसभा निवडणुकीच्या (lok sabha election 2024) पार्श्वभूमीवर चंद्रपूर पोलिस (chandrapur police) सतर्क झाल्याचे पाहायला मिळत आहे. पाेलिसांनी जिल्ह्यात एका चार चाकीमधून तब्बल 24 लाख 75 हजार रुपये जप्त केले. संबंधितांची चाैकशी सुरु असल्याची माहिती पाेलिसांनी दिली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बल्लारपूर-चंद्रपूर महामार्गावर (ballarpur chandrapur highway) गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास एक कारला चंद्रपूर पोलिसांनी थांबविले. या कारची तपासणी केली असता त्यामध्ये काही रक्कम हाेती. ही रक्कम कसली आहे याची चाैकशी पाेलिसांनी केली. परंतु कारमधील लाेकांना समपर्क उत्तर देता आले नाही. (Maharashtra News)

कारमधील व्यक्तीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पाेलिसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे. पाेलिसांनी अधिक चाैकशी केली असता ही रक्कम बल्लारपूर येथून नागपूरला नेली जात होती. पाेलिसांनी त्याच्याकडून 24 लाख 75 हजार रुपये जप्त केलेय सध्या ही रक्कम कोषागार कार्यालयात जमा करण्यात आली आहे अशी माहिती पाेलिसांनी साम टीव्हीला दिली.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup 2024: पाकिस्तानचा संघ टीम इंडियावर भारी पडणार? IND vs PAK सामन्याबाबत बोलताना हरभजन सिंग काय म्हणाला?

World Hypertension Day: World Hypertension Day 2024: जगभरात जागतिक उच्च रक्तदाब दिन का साजरा करतात? जाणून घ्या

Today's Marathi News Live : रत्नागिरीत सीएनजीचा मोठा तुटवडा

Sanjay Raut: निवडणुकीनंतर सुपारीची दुकानं बंद होणार; PM मोदी- राज ठाकरेंच्या सभेवरुन संजय राऊतांची बोचरी टीका

Pune Accident News: पुण्यात भीषण अपघात! भरधाव कंटेनर उलटला, दोघांचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT