Hingoli News, buldhana urban bank branch kalmanuri  saam tv
महाराष्ट्र

Hingoli Crime News : आर्थिक घाेटाळ्याप्रकरणी बुलढाणा अर्बनच्या शाखा व्यवस्थापकांसह 5 कर्मचा-यांवर कळमनुरीत गुन्हा दाखल

buldhana urban bank branch kalmanuri : खातेदारांसह गुंतवणुकदार चिंतेत पडले आहेत.

संदीप नागरे

Hingoli News : हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथील बुलढाणा बँकेच्या कळमनुरी शाखेत झालेल्या आर्थिक घाेटाळ्याच्या संशयावरुन कळमनुरी पोलिसांनी बॅंकेच्या पाच कर्मचा-यांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पाेलिस सखाेल तपास करीत असल्याची माहिती कळमनुरी पोलिसांनी दिली. (Maharashtra News)

कळमनुरी येथील बुलढाणा बँकेच्या शाखेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याची माहिती शहरात वा-या सारखी पसरली. यामुळे खातेदार, गुंतवणुकदार यांच्यासह कर्जदार यांचा गाेंधळ उडाला. नेमका काय प्रकार झाला याची माहिती घेण्यासाठी अनेकांनी बुलढाणा बँकेच्या कळमनुरी शाखेत धाव घेतली.

खातेधारकांत संताप

दरम्यान बँकेतील (bank) कर्मचारी व अधिकाऱ्यांनी संगनमताने हा घोटाळा केल्याचा आरोप खातेधारकांनी केला आहे. या प्रकरणी पाेलिसांत तक्रार देण्यात आली आहे. पाेलिसांत प्राप्त झालेल्या तक्रारीनूसार पाेलिसांनी पाच कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पाच जणांवर गुन्हा दाखल

या बँक कर्मचाऱ्यांनी संगनमताने खातेदारांच्या रकमा परस्पर उचलल्याचे तक्रारीत नमूद असल्याचे पाेलिसांनी स्पष्ट केले. पाेलिसांनी (police) दिलेल्या माहितीनूसार बँकेचे शाखा व्यवस्थापक वसंत घुगे, सुभाष भोयर व बँकेचे कॅशियर गजानन कुलकर्णी व इतर कर्मचारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Coronavirus: कोरोनाच्या विषाणूने कॅन्सरवर होणार उपचार, नवीन संशोधनाने डॉक्टरही हैराण

Maharashtra Election: मतदार यादीत नाव कसं शोधायचं?वोटर आयडी नसल्यास काय करावे?हे ७ मुद्दे तुम्ही वाचायलाच हवे

Tmkoc Show: जेठालालचं भांडण पेटलं, निर्मात्याची पकडली कॉलर नंतर दिली शो सोडण्याची धमकी

BJP-Congress Rada : काँग्रेस अन् भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा, जोरदार हाणामारी अन् खुर्च्या फेकल्या

IPL 2025 Mega Auction: कोणत्या संघाकडे किती रक्कम शिल्लक? कोण किती खेळाडू विकत घेऊ शकतो? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT