Nylon Manja Saam tv
महाराष्ट्र

Nylon Manja : नायलॉन मांजामुळे PSI चा गळा चिरला, रक्तस्राव होऊन जागेवरच बेशुद्ध

chatrapati sambhajinagar : आज सकाळी ते ड्युटीवर जाण्यासाठी दुचाकीने निघाले होते. सातारा परिसरातील सुधाकर नगर भागात त्यांच्या गळ्यात अचानक नायलॉन मांजा अडकला.

डॉ. माधव सावरगावे

Chatrapati Sambhajinagar Nylon Manja News : छत्रपती संभाजीनगरमध्ये काळजाचा ठोका चुकणारी घटना घडली आहे. ड्युटीवर जाणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचा (पीएसआय) नायलॉन मांजाने गळा चिरलाय. सध्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत, प्रकृती गंभीर असल्याचे समजतेय. छत्रपती संभाजीनगरमधील सातारा परिसरातून जात असताना ही घटना घडली. जखमी पोलिसाचे नाव दीपक पारधे असे आहे. ते आज नोकरीवर निघाले होते, त्याचवेळी मांजामुळे गरा चिरला गेला.

मिळालेल्या माहितीनुसार, पीएसआय दीपक पारधे हे सध्या ग्रामीण पोलिस दलात कार्यरत आहेत. आज सकाळी ते ड्युटीवर जाण्यासाठी दुचाकीने निघाले होते. सातारा परिसरातील सुधाकर नगर भागात त्यांच्या गळ्यात अचानक नायलॉन मांजा अडकला. त्यामुळे गळा चिरला अन् रक्तस्राव होऊन बेशुद्ध झाले. त्यांना तात्काळ जवळच्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. पोलिस सध्या घटनास्थळी गेले असून नायलॉन मांजा लावून पतंग उडविणाऱ्यांचा शोध घेतला जात आहे.

नायलॉन मांजा वापरला तर गुन्हा, १८ पथके तैनात -

आज संक्रातीच्या निमित्ताने पतंग उडवणाऱ्या प्रत्येकावर छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांचे लक्ष असणार आहे. पतंग उडवताना जर तुम्ही नायलॉन मांजाचा वापर करत असाल तर तातडीने तुम्हाला पोलीस ताब्यात घेतील आणि गुन्हाही दाखल करतील. नायलॉन मांजा बाळगणाऱ्यांना पकडण्यासाठी १८ पथके तैनात आहेत. शहरातील अंतर्गत रस्त्यांवर, गल्ल्यात तसेच सर्व पतंगाच्या दुकानात नायलॉन मांजा तपासला जात आहे.

आतापर्यंत ५० गुन्हे दाखल, १० जण ताब्यात -

छत्रपती संभाजीनगर शहरात नायलॉन मांजामुळे गेल्या काही दिवसात ३५ जणांना नायलॉन मांजामुळे गंभीर दुखापत झाली असल्याचे समोर आले आहे. याच कालावधीत पोलिसांनी ५० गुन्हे दाखल केले आहेत, तर १० जणांना ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे, मांजा बाळगणाऱ्यावर गेल्या वर्षभरात तब्बल ३० जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आज संक्रांत साजरी करत असताना पतंगबाजी करा मात्र दुसऱ्याच्या जीवाला धोका होणार नाही याची काळजी घ्या, असे आवाहन करण्यात आलेय.

भंडाऱ्यात नायलॉन मांजानं तरुणाचा गळा चिरला, ८ टाके लावले

दुचाकीनं नागपूरकडं जाणाऱ्या तरुणाचा नायलॉन माज्यानं गळा चिरला. ही घटना भंडाऱ्याच्या लाखनी येथील उड्डाणपुलावर घडली. शुभम जियालाल चौधरी (२४) असं गंभीर जखमी तरुणाचं नावं आहे. तो गोंदिया जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील डव्वा येथील असून तो दुचाकीनं नागपूरकडं निघाला असताना लाखनीच्या उड्डाणपुलावर ही घटना घडली. यानंतर शुभम हा जखमी अवस्थेत स्वतः लाखनी ग्रामीण रुग्णालयात पोहोचला. जखमी शुभमवर लाखनी ग्रामीण रुग्णालयामध्ये गळ्यावर ८ टाके लावण्यात आले. पुढील उपचारासाठी शुभमला भंडारा इथं रेफर करण्यात आलं असून त्याच्यावर डॉ प्रशांत पडोळे यांच्या रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार करण्यात येत असून प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Auto Rickshaw Bag : बाजारात आलीये नवीन ऑटो रिक्षा बॅग, फॅशनचा नवा ट्रेंड

Somnath Suryawanshi: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाला नवं वळण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश|VIDEO

Kondhwa Girl Abused : डिलिव्हरी बॉयकडून तरुणीवर अत्याचार; ५०० CCTV तपासले, पुण्यातील 'त्या' घटनेत मोठा ट्विस्ट, सेल्फी घेतलेला तरुणच...

Maharashtra Live News Update: कोंढवा कथित बलात्कार प्रकरणात ट्वीस्ट; तरूण फिर्यादी मुलीच्या ओळखीचा

Snake Smuggling: हिंगणघाटातील सापांची परदेशात तस्करी? अजगर, कोबरा, धामण, कवड्या; तब्बल विविध प्रजातीचे 13 साप जप्त

SCROLL FOR NEXT