buldana urban cooperative credit society, sangrampur saam tv
महाराष्ट्र

Buldana Urban News : 'बुलढाणा अर्बन' चे माेठं संकट टळलं

श्वान पथकाकडून दरोडेखोरांचा शोध घेणे सुरु आहे.

संजय जाधव

Buldhana News : बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील बुलढाणा अर्बनवर (buldana urban cooperative credit society) दरोडा टाकण्याचा प्रयत्न दरोडेखोरांचा फसला. आज (शुक्रवार) सकाळच्या सुमारास या घटनेची माहिती कळताच पाेलिसांना कळविण्यात आले. दरम्यान घटनास्थळी पाेलिस दाखल झाले असून तपास सुरु करण्यात आला आहे. (Maharashtra News)

घटनास्थळावरुन आणि पाेलिसांकडून मिळालेली प्राथमिक माहिती अशी : संग्रामपुर तालुक्यातील टुनकी या गावात बुलढाणा अर्बनमध्ये गुरुवारी रात्रीच्या सुमारास दरोडा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामध्ये दरोडेखोरांनी बुलढाणा अर्बनच्या शटरची पट्टी तोडून आत जाण्याचा प्रयत्न केला.

परंतु सुरक्षेच्या कारणास्तव बँकेत लावलेल्या सायरन वाजल्यामुळे आपण पकडले जाऊ अशी भीती दरोडेखोरांच्या मनात निर्माण झाली व दरोडेखोर पसार झाले. परंतु ते शटरची पट्टी तोडूनच तेथून पसार झाले.

याबाबत बुलढाणा अर्बन शाखा व्यवस्थापक यांनी पोलिसात माहिती कळवताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा केला. पुढील तपासासाठी त्यांनी श्वान पथकाला पाचारण केले. श्वान पथकाकडून दरोडेखोरांचा शोध घेणे सुरु आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : नाशिक मतमोजणी केंद्रावर आरोग्य सेविका चिमुकल्या बाळाला घेऊन दाखल

आज लागणार महानिकाल! कसं आहे मतमोजणीचे वेळापत्रक, पाहूया

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT