Nashik Accident News Saam Tv
महाराष्ट्र

Nashik News: नाशिकमध्ये लष्कराच्या वाहनाची दुचाकीला धडक, पोलिस निरीक्षक कुंदन सोनवणे यांचा मृत्यू

Nashik Accident News: नाशिक शहर पोलिस आयुक्तालयात देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात कार्यात असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक कुंदन सोनवणे यांचं अपघातात निधन झाल्याचं समजतं आहे.

साम टिव्ही ब्युरो

>> तबरेझ शेख, नाशिक, २१ डिसेंबर २०२३

Nashik Accident News:

नाशिकमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याचा अपघातात मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. नाशिक शहर पोलिस आयुक्तालयात देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात कार्यात असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक कुंदन सोनवणे यांचं अपघातात निधन झाल्याचं समजतं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या माहितीनुसार, कर्तव्यावरून घरी जाताना वडनेर रोड परिसरात असलेल्या लष्कराच्या पेट्रोल पंपाजवळ लष्कराच्या गाडीचा त्यांच्या दुचाकीला धक्का लागला. धक्का लागल्याने देवळाली पोलीस स्थानकात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंदन सोनोने यांचा अपघात झाला होता.  (Latest Marathi News)

मात्र लष्करी जवानांनी त्यांना उपचारासाठी लष्करी रुग्णालयात दाखल केले होते, मात्र उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले असल्याची माहिती मिळत आहे. याप्रकरणी अद्याप पोलीस ठाण्यात कुठलीही नोंद झालेली नाही. या अपघाताचे काही फोटोही समोर आले आहेत.

या फोटोंमध्ये कुंदन सोनवणे यांची दुचाकी लष्करी वाहनाच्या पुढील चाकाखाली आल्याचं दिसत आहे. अंगावर शहारे आणणारे हे फोटो आहेत. घटनास्थळी पोलीसही दाखल झाल्याचं सांगण्यात येत आहे. हा अपघात नेमका कसा झाला, याची माहितीही पोलीस घेत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : वडाळ्यातील निवडणूक कार्यालयावर मनसेची धडक

EPFO Pension : रिटायरमेंटनंतर मिळू शकतात दरमहा 12,500? EPS पेन्शनचे गणित आत्ताच घ्या समजून

Aadi Anant Movie: आजोबा-नातवाच्या नात्यातील हळवा प्रवास; अशोक सराफ- संकर्षण कराडेचा 'आदि-अनंत' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Papaya : रिकाम्या पोटी पपई खाल्ली तर शरीरात काय बदल होतात?

CJP Protest: रांका, दास अन् शिंदे, CJP च्या नेत्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात; अभिजीत दीपके आज दिल्लीत परत येणार

SCROLL FOR NEXT