Panvel Crime News
Panvel Crime News Saam tv
महाराष्ट्र

Video : पगार मागितल्याने हॉटेल मालक भडकला; कामगारावर केला धारधार शस्त्राने हल्ला, घटना सीसीटीव्हीत कैद

साम टिव्ही ब्युरो

सिद्धेश म्हात्रे

Panvel Crime News : पनवेल तालुक्यातील कळंबोलीमधून धक्कादायक वृत्त हाती आलं आहे. कळंबोलीत असलेल्या ए वन स्वीट मार्ट या दुकानात काम करणाऱ्या कामगाराने त्याचा पगार मागितल्याने खाद्यपदार्थाचा व्यवसाय करणाऱ्या मालकाने हल्ला केला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. ( Marathi Latest News)

मिळालेल्या माहितीनुसार, कळंबोली वसाहतीमधील सेक्टर १ परिसरात असलेल्या ए वन स्वीट मार्ट या दुकानात काम करणाऱ्या छोटू रामसागर राय याने त्याच ठिकाणी खाद्यपदार्थाचा व्यवसाय करणाऱ्या संतोष पासवानकडे पगााराचे उर्वरित पैसे मागितले.

मात्र, मालकाने छोटूवर चोरीचा आरोप करत शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरूवात केली. यावेळी तिथे हजर असलेले दुकान मालक हसुराम चौधरी यांनी देखील पासवान याला साथ देत छोटूला शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरवात केली. त्यामुळे हॉटेलमधील इतर सहकारी त्यांचे भांडण सोडवायला आले. मात्र, मालकाची छोटूला मारहाण सुरू होती. हॉटेल (Hotel) सुरू असल्याने काही ग्राहक देखील हॉटेलजवळ उभे होते.

मारहाणी करताना झालेल्या झाटापटीत पासवान याने मारहाणीसाठी धारधार शस्त्राचा वापर केल्याने छोटू याच्या डोक्यात आणि पोटात गंभीर दुखापत झाली आहे. छोटू यांनी केलेल्या तक्रारी नुसार कळंबोली पोलीस ठाण्यात संतोष पासवान आणि हसूराम चौधरी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपी कळंबोली पोलिसांच्या ताब्यात आहेत. ही मारहाणीची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi Speech: 'चहा विक्रेत्याने देशाची अर्थव्यवस्था ११ वरून ५व्या क्रमांकावर आणली'; पीएम मोदींनी गुजरातमध्ये काय सांगितलं?

1000 Cr. Earn Indian Films : १००० कोटी कमावलेले हिंदी चित्रपट तुम्ही पाहिले का ?, पाहा यादी

OBC Bahujan Party: सुप्रिया सुळे,विशाल पाटील वंचित कसे? 'वंचित'च्या पाठिंब्यावर ओबीसी बहुजन पार्टी प्रकाश आंबेडकरांवर नाराज

Suresh Raina: सुरेश रैनावर कोसळला दु:खाचा डोंगर! जवळच्या व्यक्तींचे अपघातात निधन

Today's Marathi News Live : कराडमध्ये केमिकल गॅसच्या टँकरला गळती

SCROLL FOR NEXT