Buldhana Bus Accident Saam tv
महाराष्ट्र

Buldhana Bus Accident: मोठी बातमी! समृद्धी अपघातप्रकरणी बस चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

Buldhana Bus Accident: समृद्धी महामार्गावरील भीषण बस अपघात प्रकरणी विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बस चालकावर पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संजय जाधव

Buldhana Bus Accident News: बुलढाण्यातील भयंकर अपघाताने महाराष्ट्र हादरून गेला आहे. समृद्धी महामार्गावर बुलढाण्यातील सिंदखेडराजाजवळील पिंपळखुटा येथे अपघात झाला आहे. या अपघातात आतापर्यंत २६ जणांचा मृत्यू झाला आहे. या भीषण बस अपघात प्रकरणी विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बस चालकावर पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Latest Marathi News)

समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघात प्रकरणी सिंदखेडराजा पोलिसांनी आरोपी शेख दानीश याच्या विरुद्ध सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या चालकास अटक देखील करण्यात आली आहे.

शेख दानीश शेख इसराईल हा विदर्भ ट्रॅव्हल्सचा चालक होता. तसेच 279, 304, 337 व 427 आयपीसी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच मोटार वाहन कायदा 184 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बुलढाण्यात बसचा अपघात कसा झाला?

१ जुलैच्या रात्री दीड वाजण्याच्या सुमारास बस बुलढाणा सिंदखेडराजा परिसरात आली. त्यावेळी बसचा वेग जास्त होता. ही भरधाव बस थेट दुभाजकाला धडकली. त्यानंतर डिझेल टाकी फुटून बसने पेट घेतला. बस दरवाच्या दिशेने उलटल्याने बसमधून प्रवशांना बाहेर पडता आले नाही. या दुर्घनेत आतापर्यंत २६ जणांचा मृत्यू झाला.

दरम्यान, काही प्रवाशांनी खिडकीच्या काचा फोडून बाहेर उड्या घेतल्या. मात्र, गाढ झोपेत असलेल्या प्रवाशांना बाहेर पडता आलं नाही. त्यामुळे प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. या अपघातात चालकासह काही जणांचे प्राण वाचले. या भयानक घटनेमुळे मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आषाढी एकादशीनिमित्त नांदेड शहरातील श्री नरहरी नरसिंह मंदिरात विठ्ठल नामाचा गजर

Pune: पंढरीच्या वाटेवर लुटमार अन् अल्पवयीन मुलीचे लचके तोडले; पोलिसांनी २ आरोपींच्या मुसक्या आवळल्या

Shahada Police : प्रायव्हेट खोल्या, सोफ्यावर कंडोम; शहाद्यात अवैध कॅफेवर पोलिसांचा छापा

अमेरिकेत पुराचा हाहाकार! 50 जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; पाहा VIDEO

Mahadev Temple: शिवमंदिरात महिलांनी केव्हा जावे? जाणून घ्या योग्य वेळ

SCROLL FOR NEXT