Chhatrapati Sambhajinagar Crime News Saam
महाराष्ट्र

संभाजीनगर हादरलं! पोलीस कर्मचार्‍याचा निर्घृण खून, मृतदेह घराशेजारीच पुरला

Chhatrapati Sambhajinagar Crime News : संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात पोलिस कर्मचाऱ्याचा निघृण खून करून मृतदेह घराशेजारीच पुरल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Namdeo Kumbhar

माधव सावरगावे, साम टीव्ही प्रतिनिधी

Police constable murdered and buried in Sambhajinagar : देवगाव रंगारी ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याचा निघृण खून करून त्याचा मृतदेह घराशेजारीच पुरल्याची धक्कादायक घटना वैजापूर तालुक्यातील बळ्हेगावात उघडकीस आली आहे. ४८ वर्षीय नानासाहेब रामजी दिवेकर असे मृत पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. या घटनेनंतर संभाजीनगरमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून या प्रकरणी गुन्हा दाखल केला आला असून तपास करण्यात येतोय.

मिळालेल्या माहितीनुसार, नानासाहेब दिवेकर हे देवगाव रंगारी येथे पोलिस नाईक म्हणून कार्यरत होते. ते छत्रपती संभाजीनगर पडेगाव येथून ये-जा करत असत. १ जानेवारीपर्यंत ते कर्तव्यावर होते. त्यानंतर, वडिलांना भेटण्यासाठी ते मूळगावी बळ्हेगावात आले. २ रोजी सकाळपर्यंत ते सोशल मीडियावर सक्रिय होते. मात्र, त्यानंतर त्यांचा संपर्क तुटला. दोन दिवस वडील घरी न परतल्याने आणि फोन लागत नसल्याने त्यांच्या मुलाने बळ्हेगावच्या सरपंचांकडे चौकशी केली. त्यानंतर, सरपंच यांनी त्यांच्या गावातील घरी जाऊन आणि त्यांच्या तेथील भावांकडे चौकशी केली असता, नानासाहेब दिवेकर हे २ जानेवारी रोजी गावी आले होते, परंतु त्यानंतर ते कुठे गेले, याची माहिती नसल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांच्या मुलाने पोलि‍सांना माहिती दिली.

त्यानंतर, शिऊर पोलिसांनी रविवारी दुपारी बळ्हेगाव येथील घराची झडती घेतली. तेव्हा दिवेकरांचा मोबाइल पलंगाखाली सापडला. घराशेजारील पडीक जागेत ताजी माती उकरलेली दिसल्याने पोलिसांनी पंचासमक्ष तेथे खोदकाम केले. तेथून सायंकाळी ६:३०च्या सुमारास नानासाहेबांचा पुरलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. घटनेची माहिती पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, उपविभागीय पोलिस अधिकारी भागवत फुंदे, स.पो.नि. वैभव रणखांब यांनी घटनास्थळाची पाहणी केली.

नातेवाइकांच्या जबाबात तफावत आढळल्याने पोलिसांनी मयताच्या नात्यातील तीन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. कौटुंबिक वाद की अन्य काही कारणातून नानासाहेब दिवेकर यांचा खून करण्यात आला, याचा तपास पोलिस करीत आहेत. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. या प्रकरणी रविवारी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास अज्ञातांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Care Fund मध्ये बॅलन्स किती?सरकारकडून आकडेवारी सार्वजनिक

श्रावण स्पेशल मालवणी स्टाईल खुसखुशीत अळूवडी; सोपी रेसिपी आजच करून पाहा!

Maharashtra News Live Update: गुहागरच्या बुधल बीचवर चिपळूणच्या दोन तरुणांचा बुडून मृत्यू

Social media workouts: सोशल मीडियावरचे हे फिटनेस ट्रेंड फॉलो करताय? ही चूक करू नका, मणक्याला होऊ शकते गंभीर इजा

Maharashtra Freedom of Religion Act : धर्म स्वातंत्र्य कायदा रक्षाबंधनापासून लागू, राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध

SCROLL FOR NEXT