भाजप-शिंदेसेनेच्या ६६ बिनविरोध उमेदवाराचे टेन्शन वाढले, आयोगाने तोपर्यंत निकाल रोखला

BJP Shinde Sena unopposed candidates controversy : महापालिका निवडणुकीतील बिनविरोध उमेदवारांबाबत मोठा निर्णय. भाजप-शिंदेसेनेच्या ६६ उमेदवारांचे निकाल चौकशी अहवाल येईपर्यंत रोखण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत.

Maharashtra unopposed candidates election commission order : राज्यातील २९ महापालिकेसाठी निवडणूक रंगली आहे. प्रचाराचा धुराळा उडालाय. अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी राज्यात ६९ उमेदवार बिनविरोध निवडून आले. यामध्ये सत्ताधारी भाजपचे ४४, शिंदेंच्या शिवेसेनेचे २२ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे २ उमेदवार बिनविरोध निवडून आले. एकाचवेळी इतके बिनविरोध उमेदवार निवडून आल्यानंतर विरोधकांकडून आरोपांचा सपाटा लावला. पाच ते १० कोटी रूपये अर्ज माघारी घेण्यासाठी दिल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर आयोगाकडून यावर दखल घेण्यात आली.

चौकशी अहवाल येईपर्यंत बिनविरोध उमेदवारांना विजयी जाहीर करू नका, असे आदेश राज्य निवडणूक आयोगाने महापालिका आयुक्तांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता बिनविरोध उमेदवारांवर टांगती तलवार आहे... एखाद्या प्रभागातील निवडणूक बिनविरोध पार पडल्यास राज्य निवडणूक आयोगाला सविस्तर अहवाल तात्काळ पाठविण्यात यावा आणि आयोगाच्या मान्यतेनंतरच निकाल जाहीर करण्यात यावा, असे आदेश देण्यात आलेत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com