अबब! पगारासाठी एसटी कर्मचाऱ्यांची विभागप्रमुखाविरोधात पोलीसबी तक्रार  अभिजीत घोरमारे
महाराष्ट्र

अबब! पगारासाठी एसटी कर्मचाऱ्यांची विभागप्रमुखाविरोधात पोलिसात तक्रार

एसटी (ST) कर्मचाऱ्यांनी चक्क पगार वेळेत मिळत नसल्याच्या कारणावरून राज्य परिवहन महामंडळाच्या भंडारा विभागप्रमुखाविरोधात पोलिसात तक्रार दिल्याची घटना भंडाऱ्यात उघडकीस आली आहे.

अभिजीत घोरमारे

भंडारा : एसटी (ST) कर्मचाऱ्यांनी चक्क पगार वेळेत मिळत नसल्याच्या कारणावरून राज्य परिवहन महामंडळाच्या भंडारा विभागप्रमुखाविरोधात पोलिसात तक्रार दिल्याची घटना भंडाऱ्यात उघडकीस आली आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी विभागप्रमुखाविरोधात पगारासाठी पोलिसात तक्रार केल्याची कदाचित हि पहिलीच घटना असावी.

हे देखील पहा -

राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांना सात तारखेला वेतन देण्यात यावे अश्या सूचना शासनाकडून देण्यात आलेल्या असताना देखील भंडारा एसटी कर्मचाऱ्यांना जुलै पेड इनचा पगार ऑगस्ट महिना संपत आला असताना देखील अद्यापही देण्यात आलेला नाही. शिवाय पगार वेळेवर मिळत नसल्याची ही समस्या प्रत्येक महिन्यात असल्याने एसटी कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान आता भंडारा जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक भुमिका घेत भंडारा एसटी विभागप्रमुख विनय गव्हाळे यांच्याविरोधात भंडारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून त्यांच्यावर गून्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. पगारासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी विभागप्रमुखाच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्याची महाराष्ट्रातील ही पहीलीच घटना असावी. आता मात्र विभागप्रमुखावर पोलिस गुन्हा दाखल करतात किंवा नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Worli Dome : वरळी डोममध्ये पाहणीदरम्यान संजय राऊत आणि प्रकाश महाजन यांची गळाभेट | VIDEO

Vijay Melava Worli: वरळी डोममध्ये मराठी सेलिब्रिटींची मांदियाळी, तेजस्विनी पंडितही मेळाव्यात सहभागी|VIDEO

Crime News : 'तो' व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; बदनामीच्या त्रासाला कंटाळून महिलेनं आयुष्य संपवलं

Worli History: 'वरळी' हे शहर कसे घडले? जाणून घ्या यामागचा रंजक इतिहास

SCROLL FOR NEXT