रामू ढाकणे, साम टीव्ही, छत्रपती संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन करून 48 गोवंश सोडवले आहेत. यामध्ये करमाड मधून 23 फुलंब्रीतून 8 देवगाव 12 तर चिकलठाणा 5 अशा एकूण 48 गोवंशाची सुटका केलीये.
या प्रकरणी जिल्ह्यात वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून हे गोवंश गो शाळेत रवाना करण्यात आले आहे. दरम्यान, हे गोवंश अवैधरित्या वाहतूक करून चालले असल्याने त्यांची इयर टॅगिंग नसल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संभाजीनगर तालुक्यातील आडगाव माहुली येथे हे कोंबिंग ऑपरेशन पोलिसांनी केले. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कुर्बानी देण्यासाठी हे गोवंश घेऊन जात होते, अशी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मात्र राज्यात गो हत्या बंदी कायदा लागू आहे. मोठ्या पोलीस बंदोबस्तात ही कारवाई केली. ज्या गोवंशाचे दाखले त्यांच्याकडे नव्हते, त्या गाई पोलिसांनी ताब्यात घेतल्या असून वीस तारखेपर्यंत सदरील गोवंशाचे दाखले आणून घेऊन जा असं सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, नाशिकच्या शहरातील फत्तेबुरूज नाका भागात सकाळी सहा वाजेच्या सुमारास छोट्या पिकअप गाडीतून कत्तलीच्या उद्देशाने गोवंशाची वाहतूक होत असल्याच्या माहिती गोरक्षकांना मिलताच त्यांनी गाडी अडवत तपासणी केली असता त्या ८ गोवंश जनावरे आढळून आल्याने तातडीने याची माहिती पोलिसांना देण्यात आली आणि कत्तलीसाठी घेऊन जात असलेल्या गोवंशाची सुटका करण्यात आली.
दरम्यान, मागील आठवड्यात नाशिकच्या शहरातील फत्तेबुरूज नाका भागात छोट्या पिकअप गाडीतून कत्तलीच्या उद्देशाने गोवंशाची वाहतूक होत असल्याच्या माहिती गोरक्षकांना मिळताच त्यांनी गाडी अडवत तपासणी केली. यावेळी तपासणीत 8 गोवंश जनावरे आढळून आल्याने तातडीने याची माहिती पोलिसांना देण्यात आली. यानंतर कत्तलीसाठी घेऊन जात असलेल्या गोवंशाची सुटका करण्यात आली.