दरोडा घालण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी दरोडेखोरांना पकडले राजेश काटकर
महाराष्ट्र

दरोडा घालण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी दरोडेखोरांना पकडले

पोलीस निरीक्षक सुभाष राठोड यांनी यापूर्वी देखील अट्टल गुन्हेगारांना जेरबंद केले होते हे विशेष आहे.

राजेश काटकर

परभणी: मानवत पोलीस ठाण्याचे पोलीस (Manvat Police Station) निरीक्षक सुभाष राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मानवत पाथरी तालुक्यातील दरोडेखोरांची पाच जणांची एक टोळी आज जेरबंद केली. रात्री गस्त घालीत असताना पाच जण वाहनाद्वारे जात असताना पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना संशय आला आणि त्यामध्ये त्यांच्यावर झडप घालून त्यांना पकडण्यात आले त्यांच्याकडून काही हत्यारे देखील जप्त करण्यात आली आहेत.

पोलीस निरीक्षक सुभाष राठोड यांनी यापूर्वी देखील अट्टल गुन्हेगारांना जेरबंद केले होते हे विशेष आहे. अनिल पवार परबीन सिंग कृष्णागिरी अर्जुन पवार रमेश दाभाडे अशी या आरोपींची नावे असल्याचे सांगण्यात येत आहेत.

पाळोदी रोड ते टी पॉईंट मध्ये रात्री दीड वाजताच्या सुमारास एका मोटरसायकलवर पाच दरोडेखोर जात असताना सपोनि भरत जाधव पूना वड राख क्षीरसागर शेख वसीम वायाळ चव्हाण घुगे यांनी पोलीस निरीक्षक सुभाष राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पाच दरोडेखोर हत्यारानिशी पकडले त्यांना वेळीच पकडले नसते तर दरोडा जबरी चोरी घरफोडी चोरी त्यांनी केली असती सदर आरोपींनी यापूर्वीसुद्धा मानवत पाथरी शहरात चोरी केली होती रेकार्डवर ते सराईत गुन्हेगार आहेत.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

श्रावण सोमवारी पहाटे दुर्घटना, मंदिरात विजेची तार तुटल्याने चेंगराचेंगरी, दोघांचा मृत्यू, 38 भाविक जखमी

Maharashtra Live News Update: भीमाशंकरची महादेव नगरी सजली, भाविक शिवभक्तीत तल्लीन

Jalgaon Crime: जुना वाद नव्यानं पेटला; धारदार शस्त्राने वार करत एकाचा जीव घेतला

Pune Crime : पुण्यात अल्पवयीन मुलांचा हैदोस; टोळक्याने ७ ते ८ गाड्या फोडल्या, VIDEO

Ind vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंडचा चौथा कसोटी सामना ड्रॉ; जडेजा अन् वॉशिंग्टनच्या दमदार खेळीने गड राखला

SCROLL FOR NEXT