Arrests, Nagpur, Police, Molested Girl Saam Tv
महाराष्ट्र

Nagpur News : संतापजनक ! नातेवाईकानेच केले निर्दयी कृत्य, नागपूरात चार वर्षीय मुलीवर अत्याचार

पाेलिस घटनेचा कसून तपास करीत आहेत.

संजय डाफ

Nagpur Crime News : नागपूरात आणखी एका चार वर्षीय मुलीवर अत्याचार झाल्याची घटना समाेर आली आहे. सलग तिसऱ्या दिवशी अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना समाेर आल्याने कायदा व सुवव्यवस्था ढासळल्याची चर्चा शहरात सुरु आहे. (Maharashtra News)

कळमना पोलीस ठाण्याच्या (kalamna police station) हद्दीत हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी पाेलिसांनी विष्णू सुखलाल भारती (२८) या संशयिताला अटक करण्यात आली आहे. विष्णू हा पिडीत मुलीचा नातेवाईक असल्याची माहिती पाेलिसांनी दिली.

त्याचे त्यांच्या घरी नेहमी येणेजाणे होते. १७ एप्रिल रोजी तो सकाळच्या सुमारास त्यांच्या घरी आला. मुलीची आई कामावर गेली होती. त्याचा फायदा उठवत त्याने तिच्यावर अत्याचार केला.

यानंतर मुलीला वेदना होऊ लागल्या व तिची तब्येत बिघडली. ती माेठं माेठ्याने रडून लागली. तिच्या आईने घरी आल्यावर काय झाले असे विचारले असता दाेन्ही मुलींनी सांगितलेल्या माहितीच्या आधारे आईने पाेलिसांत धाव घेतली.

पाेलिसांनी चाैकशी अंती विष्णू याच्यावर पोक्सो कायद्या अन्वये गुन्हा नोंदविला. त्यानंतर पाेलिसांनी विष्णु यास अटक केली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kondura Beach : येणारा मोठा वीकेंड सिंधुदुर्गला प्लान करा; 'कोंडुरा' बीचचं सौंदर्य पाहून मालदीव,थायलंड विसराल

Maharashtra Live News Update: अकोल्यात बकरीला वाचवण्यासाठी गेलेल्या व्यक्तीचा पाण्यात बुडुन मृत्यू

Kishor Kadam : किशोर कदम यांचे राहते घर धोक्यात; सरकारला केली विनंती, नेमकं प्रकरण काय?

दुहेरी हत्याकांडाने ठाणे हादरलं, भाजप नेत्याची कार्यलयातच हत्या, भिवंडीत रात्री ११ वाजता काय घडलं?

खोटं धर्मांतरण करून दुसरं लग्न, पोलीस कर्मचाऱ्याला सेवेतून बडतर्फ; धुळ्यात खळबळ

SCROLL FOR NEXT