Sangli News : सांगली (sangli) जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील कापूसखेड रस्त्यावरील जमीन जबरदस्तीने हडप करण्याच्या प्रकरणात पोलिसांनी दखल घेतली नाही असा दावा करीत नणंद-भावजयीने इस्लामपुरातील पोलिस ठाण्याच्या दारात आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी (police) सतर्कता दाखविल्याने पुढील अनर्थ टळला. या दोघींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (sangli latest marathi news)
धुमाळे कुटुंबाचे कापूसखेड रस्त्यावर शेत आहे. सध्या या परिसरात प्लॉट पाडून जमीन खरेदी- विक्रीचे व्यवहार जोमात होत आहेत. बड्या राजकीय कार्यकर्त्यांनी या परिसरात आपली मालमत्ता केली आहे.
धुमाळे कुटुंबाच्या या जागेलगत असणाऱ्या एका बड्या कार्यकत्याने त्यांच्या १०९ गुंठे जागेला कुंपण मारण्यासाठी काल सकाळी खांब रोवण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे हतबल झालेल्या या कुटुंबाने पोलिसांत धाव घेतली. (Maharashtra News)
पोलिसांनी माहिती अथवा त्यांची फिर्याद घेण्यास टाळाटाळ चालविली होती असा आराेप पूजा ऋतुराज धुमाळे आणि आरती प्रवीण धुमाळे यांनी केला. पाेलिस दाद देत नाहीत हे लक्षात आल्यावर संतापलेल्या आरती आणि पूजा या दोघींनी पोलिस ठाण्याच्या दारातच आपल्या आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी उपस्थित पोलिसांनी दोघींना ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला. या दोघींना पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईसाठी ताब्यात घेतले आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.