chandrapur, santoshsingh rawat, dcc bank chandrapur, saam tv
महाराष्ट्र

Chandrapur News : चंद्रपूर जिल्हा बँक अध्यक्ष गाेळीबार प्रकरण: बाबूपेठ परिसरातून दाेघे पाेलीसांच्या ताब्यात

पाेलीस संशयितांची चाैकशी करीत आहेत.

संजय तुमराम

Chandrapur News : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंग रावत (santoshsingh rawat chairman dcc bank chandrapur) यांच्यावरील गोळीबार प्रकरणी मोठी घडामोड समाेर आली आहे. या प्रकरणी चंद्रपूर शहरातून दोन संशयित हल्लेखोरांना पाेलीसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. (Maharashtra News)

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंग रावत (santoshsingh rawat) यांच्यावर गुरुवारी (ता. 11 मे) रात्री मूल शहरात (mul city) प्राणघातक हल्ला झाला. या घटनेचे पडसाद मूल शहरात उमटले. हल्लेखाेरांना तातडीने अटक करा या मागणीसाठी काॅंग्रेसने शहर बंद ठेवण्याचे आवाहन केले हाेते. त्यास गावातून प्रतिसाद मिळाला हाेता.

दरम्यान या हल्लाप्रकरणी याेग्य तपास हाेत नसल्याच्या नाराजीतून येत्या 25 मे रोजी काँग्रेसने सर्वपक्षीय बंद व रास्ता रोको करण्याचा इशारा प्रशासनास दिला होता. साेमवारी (ता. 22 मे) शहरातील बाबूपेठ परिसरात रात्री स्थानिक गुन्हे शाखा व विशेष तपास चमुने धाड टाकली. या धाडीत रावत यांच्या हल्लाप्रकरणी दोन संशयित पाेलीसांनी ताब्यात घेतले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT