- तबरेज शेख
Nashik Latest Marathi News : नाशिक शहरात घरफोडी चोरी करणा-या अटल गुन्हेगारांना पाेलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडुन १२ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. या घरफोडीतील संपुर्ण मुद्देमाल हस्तगत करण्यात गुन्हे शाखा युनिट क्र. १ ला यश आले आहे. विशेष म्हणजे जुगार खेळण्यासाठी संशयित चोरी (theft) करायचे अशी माहिती समाेर आली आहे. (Maharashtra News)
काही दिवसांपूर्वी मुंबईनाका पोलीस स्टेशन हद्दीतील वडाळारोडवरील जे.एम.सी.टी. कॉलेज समोर असलेल्या बिल्डींग मधील फ्लॅट नं.३ मध्ये लाखो रुपयांच्या किंमतीचे सोन्याचे दागिने व रोख रुपयांची घरफोडी चोरी झाली होती. या घरफोडीतील संशयित आरोपींना अटक करण्यात पाेलिसांना (police) यश आले आहे.
या गुन्हयाचा समांतर तपास करीत असताना घटनास्थळावरील व घटनास्थळाचे आजुबाजुस असलेले सी.सी.टि.व्ही. फुटेज पाेलिसांनी त्यांच्या ताब्यात घेतले. सी.सी.टि.व्ही. फुटेजच्या आधारे संशियत आरोपींची ओळख पटवली. त्यानंतर गुप्त बातमीदाराकडून माहिती घेतली असता संशयित हा अजमेर येथे गेला असल्याचे पाेलिसांना समजले.
सात जानेवारीला संशयित नाशिकला (nashik) येणार असल्याची खात्रीशीर माहिती पाेलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत वडाळा गाव येथे राहणा-या शहानवाज उर्फ बरग्या अन्दर खान, जुने सिडको येथील मनोज उर्फ बाळा त्रंबक गांगुर्डे राणाप्रताप चौक येथे राहणारा पवन रविंद्र कुलकर्णी यांना ताब्यात घेतले. शहानवाजकडे घरफोडी चोरीच्या गुन्हया संबंधाने सखोल विचारपुस केली असता, त्याने घरफोडी चोरी केल्याची कबुली दिली. फक्त जुगार खेळण्यासाठी चोरी करत असल्याे त्याने यांनी पोलिसांना संघितले.
घरफोडीतील सोन्या चांदीचे दागिने त्याचे सोबत असलेले साथीदार मनोज गांगुर्डे व पवन कुलकर्णी यांच्या मार्फत विक्री केल्याची कबुली दिली. त्यानुसार संशयितांना मुंबईनाका पोलीसांनी अटक करुन त्यांच्याकडून १११.७९ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने. त्यात दोन सोन्याच्या लगडी तसेच गुन्हयात वापरलेली पॅशन मोटार सायकल असा (एकुण ५,८५,३४८ रुपये) मुद्देमाल हस्तगत केला. (Nashik Latest Marathi News)
शहानवाज उर्फ बरग्या खान हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याचे विरुध्द यापुर्वी ०८ घरफोडी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. गुन्हयाचे तपासात संशियातांकडून मुंबईनाका पोलीस स्टेशनकडील ८ व इंदिरानगर पोलीस स्टेशनकडील ४ असे एकुण १२ गुन्हे उघडकीस आणले आहेत. त्यांच्याकडून सोन्याचे दागिने, सोन्याच्या लगडी (११,७०, ७५८ रुपये) तसेच गुन्हयात वापरलेली मोटार सायकल असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे अशी माहिती प्रशांत बचाव (पोलिस उपायुक्त) यांनी दिली.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.