Latur, Arrest, Pune, Nanded saam tv
महाराष्ट्र

Crime News : घरफाेडी प्रकरणात 7 अटकेत, 52 लाख 53 हजारांचा मुद्देमाल जप्त; पुणे, बीड, नांदेड, यवतमाळात कारवाई

घरफाेडीच्या गुन्ह्यातील संशयितांना अटक झाल्याने एलसीबी आणि विवेकानंद पाेलीस ठाण्याच्या कर्मचा-यांचे शहरात काैतुक हाेत आहे.

दीपक क्षीरसागर

Latur : स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि विवेकानंद पाेलिस ठाणे यांनी संयुक्तपणे केलेल्या तपासानंतर घरफाेडीच्या प्रकरणात एकूण सात जणांना अटक (arrest) करण्यात आली आहे. त्यांच्याकडून बावन्न लाख त्रेपन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या पथकानं एकूण तेरा गुन्ह्याची उकल केली आहे. (Latur Crime News)

लातूर शहरात गेल्या महिन्यात श्रीनिकेतन सोसायटी येथील एका घराचा दरवाजा उघडून घरातून सोन्या-चांदीचे दागदागिने व रोख रक्कम असा तेवीस लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञातांनी पळवला होता. याबाबत विवेकानंद चौक पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणाचा शाेध घेण्यासाठी एलसीबी आणि पोलीस ठाणे विवेकानंद चौक येथील पोलीस अधिकारी विशेष पथक तयार करण्यात आले होते. दरम्यानच्या काळात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून गुन्ह्यातील संशयित आरोपी पुणे येथील लखन उर्फ अमरदीप दशरथ जोगदंड, किशोर उर्फ पप्पू काशिनाथ जोगदंड, बीड जिल्ह्यातील प्रवीण उर्फ डॉन्या चंद्रकांत माने यांना त्यांचे राहते जागेवरून ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात आली.

या चाैकशीत संशयितांनी लातूर येथे चोरी केल्याचे कबूल केले. या गुन्ह्यात चोरलेला मुद्देमाला पैकी एक लाख वीस हजार रुपये रोख व गुन्ह्यात वापरलेली एक गाडी असा एकूण सात लाख वीस हजार रुपयाचा मुद्देमाल त्यांच्याकडून जप्त करण्यात आला.

दरम्यान त्यानंतर पाेलिसांनी सूर्यकांत उर्फ सुरेश उर्फ दादा श्रीराम उर्फ राम मुळे, अविनाश शंकर देवकर, सुरेश उर्फ सूर्यकांत रामकिशन गंगणे आणि सुदर्शन सुदर्शन उर्फ सोन्या विठ्ठलराव माने यांना नांदेड व यवतमाळ जिल्ह्याच्या सिमे लगतच्या भागातून ताब्यात घेण्यात आले.

त्यांनी देखील लातूर येथे चाेरी केल्याचे कबूल केले. त्यांच्याकडून चोरलेल्या मुद्देमाला पैकी सोन्याचे नेकलेस, अंगठ्या, मंगळसूत्र बांगड्या, सोन्याची बिस्किट असा एकूण अठरा लाख चार हजार पाचशे रुपयांचा जप्त करण्यात आला.

पाेलिसांनी या सर्वांना अटक केली. संबंधित संशयितांकडून एकूण घरफोडीचे तेरा गुन्हे उघडकीस आणण्यात पाेलिसांना यश आले आहे. तसेच त्यांनी विविध गुन्ह्यात चोरलेला एकूण नऊशे ग्रॅम इतक्या वजनाचे सोन्याचे दागिने व पाचशे ग्रॅम चांदीचे वस्तू व रोख रक्कम त्यांनी गुन्ह्यात वापरलेली गाडी असा एकूण बावन्न लाख त्रेपन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India Bangladesh Tour: टीम इंडियाचा बांगलादेश दौरा का झाला रद्द? काय आहे कारण,जाणून घ्या

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

SCROLL FOR NEXT