Sambhajinagar Adarsh Scam Saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar Adarsh Scam : आदर्श घोटाळा प्रकरणी रामसिंग जाधव अटकेत

माधव सावरगावे

Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या घोटाळा प्रकरणी आणखी एका संचालकाला अटक करण्यात आली आहे. आता अटकेतील आरोपींची संख्या पाच झाली आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. (Maharashtra News)

आदर्श नागरी पतसंस्थेच्या संचालकांवर वेगवेगळ्या संस्थांच्या आणि जवळच्या व्यक्तीच्या नावावर कर्ज लाटून 202 कोटींचा घोटाळा केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी अध्यक्ष अंबादास मानकापे (ambadas mankape) याच्यासह 50 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रुपये 202 कोटीच्या आदर्श घोटाळा प्रकरणात पोलिसांनी कारवाई केल्यानंतर आत्तापर्यंत 35 मालमत्ता उघडकिस आणल्या आहेत. पाेलिसांनी उघडकिस आणलेल्या मालमत्तेत आदर्श बँक पत संस्थेचे कार्यालय, जमीन आणि अध्यक्ष मानकापे यांच्या घराचा समावेश आहे.

दरम्यान आणखी एका संचालक रामसिंग जाधव याला पाेलिसांनी अटक केली आहे. आता अटकेतील आरोपींची संख्या पाच झाली आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. आदर्श घोटाळ्यात आता पोलीस पथके चांगलेच सक्रिय झाले आहेत.

एकीकडे आरोपींचे अटक (arrests) सत्र सुरू आहे. काही पथके मालमत्तेची माहिती गोळा करीत आहे. तर काही आरोपींचा शोध घेत आहेत. आत्तापर्यंत पोलिसांनी आदर्श पतसंस्थेची 35 मालमत्ता उघडकिस आणली आहे.

यात वेगवेगळ्या ठिकाणी असलेले त्यांचे कार्यालय, इमारत यांचा समावेश आहे. बऱ्याच ठिकाणी जमीनही समोर आली आहे. फुलंब्रीत एकाच ठिकाणी 75 एकर जमीन आढळून आली आहे. दरम्यान पोलिसांनी अध्यक्ष मानकापे यांच्या घराची झडती घेतली मात्र तिथे काहीच मिळून आले नाही. इतर सदस्यांनी घरातील सर्व साहित्य घेऊन पसार झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

200MP कॅमेरा, 12 जीबी रॅम; 12000 रुपयांनी स्वस्त झाला Samsung चा हा जबरदस्त फोन, जाणून घ्या किंमत

AC Disadvantages : २४ तास AC मध्ये असता? वाचा आरोग्यावर होणारे दुष्परिणाम

Astrology: ऑक्टोबरमध्ये जन्मलेले लोक असतात भाग्यवान, तुमचा बर्थडे कधी?

October Heat: ऑक्टोबर हिटमध्ये अशी घ्या आरोग्याची काळजी

Marathi News Live Updates : पुणे बोपदेव घाट बलात्कार प्रकरण : पोलिसांकडून १०० पेक्षा अधिक संशियतांची चौकशी सुरु

SCROLL FOR NEXT