chhatrapati sambhaji nagar, adarsh nagari sahakari patsanstha aurangabad saam tv
महाराष्ट्र

Sambhajinagar Adarsh Scam : 'आदर्श' चे अध्यक्ष अंबादास मानकापेच्या नातेवाईकांना अटक

adarsh nagari sahakari patsanstha case : पतसंस्थेतील घोटाळ्यामुळे आपले पैसे कधी मिळणार याची चिंता ठेवीदारांना लागली आहे.

Siddharth Latkar

- नवनीत तापडिया

Chhatrapati Sambhaji Nagar News : छत्रपती संभाजीनगर येथील आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या 200 कोटींच्या प्रकरणी पतसंस्थेचे अध्यक्ष अंबादास मानकापे पाठाेपाठ नातेवाईकांवर देखील पाेलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. मानकापे याच्या दाेन सुनांसह चार जणांना पाेलिसांनी अटक केली. (Maharashtra News)

आदर्श नागरी पतसंस्थेच्या संचालकांवर वेगवेगळ्या संस्थांच्या आणि जवळच्या व्यक्तीच्या नावावर कर्ज लाटून 200 कोटींचा घोटाळा केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी अध्यक्ष अंबादास मानकापे याच्यासह 50 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एसआयटीने आदर्श नागरिक सहकारी पतसंस्थेचा संचालक अंबादास मानकापेच्या सुना सुनंदा मानकापे, वनिता मानकापे व वनिताचा भाऊ संदीप पवार, मुख्य व्यवस्थापक देविदास अधानेची पत्नी सविता हिला नुकतीच अटक केली.

आदर्श नागरिक जनकल्याण प्रतिष्ठान व आदर्श नागरिक दूध डेरी याच्या नावे कोट्यावधींचे बोगस कर्ज उचलण्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला.

त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 16 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश दिले आहेत. आदर्श पतसंस्थेत (adarsh nagari sahakari patsanstha) 11 जुलै रोजी 202 कोटींचा घोटाळा उघडकीस आल्यानंतर आतापर्यंत यात सहा संचालकांना अटक करण्यात आली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : यापुढे बोलताना काळजी घेईल, कोकाटेंचे स्पष्टीकरण

Monsoon hepatitis symptoms: पावसाळ्यात गर्भवती महिलांना हिपॅटायटीस संसर्गाचा धोका; 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

Building Scam : ईडीची वसईत १२ ठिकाणी छापेमारी, माजी आयुक्तांच्या घरी टाकली धाड, नेमकं प्रकरण काय?

Walnut Benefits: दररोज ३ ते ४ अक्रोड खाल्ल्याने दूर होते आरोग्याची 'ही' त्रासदायक समस्या

Maharashtra Politics : माणिकराव, तुमच्यामुळे सरकारची बदनामी होतेय, अजित पवारांकडून राजीनाम्याचे संकेत

SCROLL FOR NEXT