Jalna News : सीमेवरून परतताना वाहन दरीत कोसळून झालेल्या अपघातात जालना (jalna) जिल्ह्यातील जाफराबाद शहरातील जवान हुतात्मा झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. किशोर पारवे (Naik Parve Kishore) असं हुतात्मा झालेल्या जवानाचं नाव आहे.
किशाेर पारवे हे पूर्व सिक्कीमच्या सीमेवर कार्यरत होते. सीमेवर तैनात जवानाचे वाहन कॅम्पवर परत येत असताना रस्त्याच्या खाली दरीत कोसळले. या अपघातात किशोर पारवे यांच्यासह अन्य एकजण हुतात्मा झाले. (Maharashtra News)
किशोर पारवे हे सैन्यामध्ये मूळ युनिट 18 महार रेजीमेंट मध्ये होते. या घटनेमुळं जाफराबादसह तालुक्यात शोककळा पसरली आहे. परावे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, भाऊ, भाऊजयी, पुतणे असा परिवार आहे.
दोन दहशतवाद्यांचा खात्मा
देशाच्या सीमेवर आणि इतर संवेदनशील ठिकाणी भारतीय लष्कर तैनात असते आणि परिस्थितीनुसार शत्रूंचा सामना करण्याचे कामही करते. काश्मीरमध्येही पुंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेचे (एलओसी) रक्षण करणाऱ्या लष्कराच्या जवानांनी सीमेपलीकडून घुसखोरीचा प्रयत्न नुकताच हाणून पाडला. त्यात दोन दहशतवाद्यांना ठार मारण्यात लष्करास यश आले.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.