अमरावती: अमरावती शहरालगतच्या बडनेरा येथील रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखान्याचे निर्माण कार्य युद्धस्तरावर सुरू आहे. या कामाच्या पूर्ततेसाठी कोरोना काळात खासदार नवनीत राणा यांनी अथक परिश्रम करून ८० कोटींचा निधी खेचून आणला. या कारखान्याचे निर्माणकार्य येत्या २०२२ मध्ये पूर्ण करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण केले जाईल, असा संकल्प खासदार नवनीत राणा यांनी केला आहे. (PM will inaugurate railway wagon factory in Badnera said MP Navneet Rana)
हे देखील पहा -
खासदार नवनीत राणा यांनी शुक्रवारी वॅगन दुस्ती कारखान्याच्या निर्माण कार्याची पाहणी केली. वॅगन कारखान्याचे शेड, पिट लाईन, कॉर्ड लाईन, प्लॅटफॉर्म, व्हेंटिलेशन आदी कामे अंतिम टप्प्यात असून उरलेली सर्व कामे कुठल्याही परिस्थितीत फेब्रुवारी २०२२ पर्यंत पूर्ण करण्यात यावी, अन्यथा कंत्राटदाराला ‘ब्लॅक लिस्टेट’ करून त्यांना आर्थिक दंड ठोठावण्यात येईल, असा इशारा त्यांनी यावेळी दिला. या प्रकल्पाशेजारी प्रशस्त इमारत, २०० क्वॉटर्स तर कारखान्यांचे शेड उभारले जाणार आहे.
१९६ एकर जमिनीवर साकारणार प्रकल्प
बडनेरा येथे पाचबंगला परिसरातील उत्तमसरा मार्गावर रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखान्याच्या १९६ एकर जमिनीवर साकारला जाणार आहे. रेल्वे वॅगन दुरुस्ती कारखान्याच्या निर्मितीची जबाबदारी पाटणा येथील रेल्वे बांधकाम विभागावर सोपविली आहे. ई-निविदा प्रक्रिया राबविण्यापासून ते कंत्राटदार नेमून हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासह विविध बाबी पाटणा रेल्वे बांधकाम विभागाला पूर्ण कराव्या लागणार आहेत.
बडनेरा जुना महामार्गवरून जाणाऱ्या अमरावती- बडनेरा रेल्वे लाईनवर खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांच्या अथक प्रयत्नांनी जुनी वस्ती येथे उड्डाणपूल व भुयारी मार्ग मंजूर झाला. या उड्डाणपूल व भुयारी मार्गाचे भूमिपूजन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते होणार असल्याची घोषणा खासदार राणा यांनी केली. यावेळी खासदार नवनीत राणा यांच्यासमवेत डीपीएम भट्टाचार्य, स्टेशन मास्तर सिन्हा, आरपीएफ मानस, नरवाल, इवनाते इत्यादीजण उपस्थित होते.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.