PM Narendra Modi  Saamtv
महाराष्ट्र

PM Narendra Modi: PM मोदींचा नागपूर दौरा, हेडगेवारांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन; स्वागत फलकांनी वेधलं लक्ष

PM Modi’s Nagpur Tour: पीए नरेंद्र मोदी नागपूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी हेडगेवारांच्या स्मृती स्थळाला अभिवाद केलं. सध्या ते दीक्षाभूमीच्या दिशेने रवाना झाले आहेत. त्यांच्या या दौऱ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Priya More

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज गुढीपाडव्याच्या दिवशी नागपूर दौऱ्यावर असणार आले आहेत. पीएम मोदी नागपूरमध्ये दाखल झाले असून त्यांनी हेडगेवारांच्या स्मृती स्थळावर अभिवाद केले. त्यानंतर ते दीक्षाभूमीच्या दिशेने रवाना झाले. पीएम मोदींच्या दौऱ्यानिमित्त संपूर्ण शहरात स्वागताची जय्यत तयारी केली आहे. शहरात 5 हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. "मोदी है तो मुनकीन है एक है तो सेफ है, मोदी है तो मुनकीन है" अशा पद्धतीचे फलक नागपूर शहरात ठिकठाकाणी लावण्यात आले आहेत आणि हे फलक लक्ष वेधून घेत आहेत.

https://i.ytimg.com/an_webp/Ppic5TZarVo/mqdefault_6s.webp?du=3000&sqp=CIDeor8G&rs=AOn4CLCnQw9342jUEiGuNxZSviBfKzgukA

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माधव नेत्रालयाच्या हिंगणा मार्गावरील विस्तारित वास्तूच्या भूमिपूजन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हे एकाच मंचावर असणार आहे. यावेळी स्वामी अवदेशानंद गिरी महाराज स्वामी गोविंद देवगिरी महाराज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मते नितीन गडकरी सुद्धा उपस्थित असणार आहे. नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाल्यावर तिसऱ्यांदा नागपूर दौऱ्यावर आले आहेत.

पीएम मोदी दीक्षाभूमीला भेट दिल्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या रेशीम बागेतील स्मृती मंदिर, तसेच उद्योगपती सत्यनारायण नुवाल यांच्या अमरावती मार्गावरील बाजारगावच्या सोलर एक्सप्लोझिव्ह कंपनीला ही भेट देणार असल्याची माहिती पुढे येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी दौऱ्यावर येणार असल्याने माधव नेत्रालयाचे विश्वस्त अविनाश चंद्र अग्निहोत्री, यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनेक पदाधिकाऱ्यांच्या बैठका पार पडत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आरएसएसच्या रेशीमबाग भेटीदरम्यान सरसंघचालक डॉ.मोहन भागवत देखील उपस्थित राहणार आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांचं आरएसएसचे माजी सरकार्यवाह भैय्याजी जोशी स्वागत करणार आहेत. 'डॉ. हेडगेवार स्मारक समिती'चे अध्यक्ष असल्याने भैय्याजी जोशी पंतप्रधान मोदी यांचे स्वागत करणार आहेत. प्रत्येक प्रतिपदेला सरसंघचालक डॉ.मोहन भागवत रेशीमबागच्या स्मृती मंदिरात उपस्थित असतात. आरएसएसच्या स्मृती मंदिर भेटीनंतर सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माधव नेत्रालयाच्या भूमिपूजन सोहळ्यातही एकाच मंचावर उपस्थित राहणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tomato Tips : टोमॅटो गावठी की हायब्रिड? फरक कसा ओळखायचा? बेस्ट टिप्स

महायुती सरकारकडून विरोधकांना चहापानचं निमंत्रण; महाविकास आघाडीने केली भूमिका स्पष्ट|VIDEO

Maharashtra News Live Update: पुणे शहराला दिलासा! मध्यवर्ती भागासह उपनगरात पावसाला सुरुवात

Rain Alert: वादळी वाऱ्यासह पाऊस धुमाकूळ घालणार, पुढचे १५ तास महत्वाचे; २० राज्यांना अलर्ट, महाराष्ट्रात काय स्थिती?

Maharashtra Politics: 'ऑपरेशन टायगर' सोपं नाही, खासदाराचं तळ्यात-मळ्यात; एकनाथ शिंदेंचा डाव फसणार? वाचा Inside Story

SCROLL FOR NEXT