PM Narendra Modi On Samruddhi Highway Accident Saamtv
महाराष्ट्र

Buldhana Bus Accident: बुलढाणा बस अपघाताच्या घटनेने PM नरेंद्र मोदी हळहळले; मृतांच्या नातेवाईकांना मदत जाहीर

Samruddhi Highway Bus Accident News: समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र हादरुन गेला आहे.

Gangappa Pujari

PM Narendra Modi On Samruddhi Highway Accident: समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र हादरुन गेला आहे. आज पहाटेच्या सुमारास बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर विदर्भ ट्रॅव्हल्सचा शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला.

तर ८ प्रवाशी जखमी झाले आहेत. या अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही शोक व्यक्त केला असून बस दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना PMNRF कडून 2 लाखांची तर जखमींना 50 हजारांची मदत जाहीर केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, समृद्धी महामार्गावरुन (Samruddhi Mahamarg Accident) ही बस नागपूरहून पुण्याच्या दिशेने निघाली होती. यावेळी बुलढाण्याजवळ टायर फुटल्याने बस अनियंत्रित होऊन डिव्हायरला धडकली. ज्यानंतर बसने पेट घेतला. या दुर्देवी घटनेत २५ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला...

काय म्हणाले; पंतप्रधान नरेंद्र मोदी...

महाराष्ट्रातील बुलढाणा येथे झालेल्या भीषण बस दुर्घटनेने अतिशय दु:ख झाले. ज्यांनी आपले प्राण गमावले त्यांच्या कुटुंबियांसोबत माझे विचार आणि प्रार्थना आहेत. जखमी लवकर बरे होवोत. स्थानिक प्रशासन बाधितांना शक्य ती सर्व मदत करत आहे. असे पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) म्हणाले. तसेच या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून 2 लाखांची तर जखमींना 50 हजारांची मदत दिली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

शरद पवारांची प्रतिक्रिया...

या अपघातानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनीही ट्वीट करत शोक व्यक्त केला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा पिंपळखुटा भागात समृध्दी महामार्गावर लक्झरी बस उलटून भीषण अपघात झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या अपघातात 25 प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली. अपघातातील जखमींवर लवकरात लवकर उपचार होऊन ते बरे व्हावेत ही प्रार्थना; असे ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vasai: वसईत भाजप-बविआ कार्यकर्ते भिडले, पोलिसांकडून लाठीचार्ज; VIDEO समोर

चंद्रपुरात काँग्रेस बाजी मारणार? विजय वड्डेटीवारांची खेळी यशस्वी ठरली

Municipal Elections Voting Live updates: उल्हासनगर महानगरपालिका निवडणूक; पॅनल क्रमांक 18 मधील मत पेट्या घेऊन जाताना गोंधळ

Saam TV exit poll: परभणीत सर्वात ठाकरेसेना ठरणार मोठा पक्ष; सत्ता कोणाच्या हाती येणार?

Saam Tv Exit Poll: छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरे बंधूंचा जोर कमी पडला? कुणाची सत्ता येणार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT