गणेश कवाडे, ता. २० सप्टेंबर २०२४
PM Narendra Modi Speech Wardha: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. वर्ध्यामध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम विश्वकर्मा योजनेचा वर्षपूर्ती सोहळा पार पडला. तसेच पीएम मित्रा पार्क, आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र योजना, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजनांचा शुभारंभही यावेळी करण्यात आला. पंतप्रधान मोदींसह राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजित पवारही या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वकर्मा योजनेसाठी १४ कोटींचे कर्ज दिल्याचे विकसित भारतासाठी विश्वकर्मा योजना रोडमॅप असल्याचे म्हटले.
"दोन दिवसांपूर्वी आपण विश्वकर्मा पूजा उत्सव साजरा केला. आज वर्ध्याच्या पवित्र भूमीवर विश्वकर्मा योजनेच्या यशस्वितेला साजरे करत आहोत. याच दिवशी 1942 मध्ये महात्मा गांधींनी अस्पृश्यतेच्या विरोधात अभियान सुरू केलं होतं. महात्मा गांधी आणि विनोब भावेंची भूमी विकसित भारत संकल्पाला बळ देणारी आहे. बापूंच्या प्रेरणा आमच्या संकल्पनेला सिद्धीस नेण्याचं माध्यम व्हा," असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
"आज अमरावतीत पीएम मित्र पार्कचा शिलापूजन झालं, सर्वांचे अभिनंदन असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. वर्षांपूर्तीसाठी आम्ही वर्धेला निवडलं कारण हा कार्यक्रम केवळ शासकीय नाही तर हजारो वर्षांपासूनच्या कौशल्याला वापरण्याचं मध्यम आहे. भारतीय ज्ञान विज्ञानाला सुतार लोहार सोनार कुंभार मूर्तिकार हे घटक घरोघरी पोहोचवायचेत. गुलामीच्या काळात इंग्रजांनी हे टॅलेंट संपविण्यासाठी अनेक प्रयत्न केले. महात्मा गांधींनी इथूनच ग्रामीण उद्योगाला चालना देण्यासाठी प्रयत्न केले . मात्र स्वतंत्र उत्तर काळातील सरकारांनी या गोष्टीला महत्त्व न देता विश्वकर्मा समाजाची उपेक्षा केली.
"आमच्या सरकारने या परंपरागत कौशल्याला प्रोत्साहन देण्यासाठी विश्वकर्मा योजना आणली. सन्मान, सशक्तीकरण आणि समृद्धी हे विश्वकर्मा योजनेचं उद्दिष्ट आहे. देशातील 700 हुन अधिक जिल्हे आणि अडीच लाखांहून अधिक ग्रामपंचायती अभियानाला गती देतायत. वर्षभरात 20 लाख लोकांना जोडलं गेलं, 8 लाख कामगारांना कौशल्य प्रशिक्षण देण्यात आलं. केवळ महाराष्ट्रात 7 हजार कामगारांना प्रशिक्षण देण्यात आले. वर्षभरात साडेसहा लाखांहून अधिक बांधवांना आधुनिक उपकरणे उपलब्ध करून दिली आहेत, त्यातून उत्पादकता वाढली असून त्यांना 15 हजारांचं ई व्हाऊचर देखील देण्यात आलंय.
एससी, एसटी, ओबीसी समाजातील मंडळींकडे मागील सरकारांनी दुर्लक्ष केले. काँग्रेसने या घटकांना जाणूनबुजून मागे ठेवलं. मागासवर्गीय विरोधी मानसिकतेला आम्ही मागे टाकले. विश्वकर्मा योजनेचा सर्वाधिक फायदा एससी एसटी ओबीसीला मिळाला आहे. महाविकास आघाडीने कापसाला शेतकऱ्यांची ताकद बनवण्यापेक्षा त्यांची उपेक्षा केली. मविआने केवळ भ्रष्टाचार केला, असे गंभीर आरोपही पंतप्रधान मोदींनी केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.