CM Eknath Shinde Speech:  Saamtv
महाराष्ट्र

Cm Eknath Shinde: 'राममंदिर बांधून बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण केलं...' मुख्यमंत्री शिंदेंकडून पंतप्रधान मोदींचे कौतुक

National Youth Festival 2024: नाशिकमध्ये तपोनव मैदानात 27 व्याराष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन झाले. पंतप्रधान मोदींसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय मंत्री अनुगान ठाकूर यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित आहेत

Gangappa Pujari

CM Eknath Shinde Speech:

देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi Road Show) आज नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशिककरांनी पंतप्रधानांचे मोठ्या जल्लोषात स्वागत केल्याचे पाहायला मिळाले. संपूर्ण नाशिक नगरी ही पंतप्रधानांच्या स्वागतासाठी सजवण्यात आलेली आहे. नाशिकमध्ये तपोनव मैदानात 27 व्याराष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन झाले.

पंतप्रधान मोदींसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय मंत्री अनुगान ठाकूर यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित आहेत. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदींचे तोंडभरुन कौतुक केले.

काय म्हणाले मुख्यमंत्री शिंदे?

“नाशिकच्या पवित्र भूमीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्याची संधी आम्हाला दिली. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. पंतप्रधान नाशिकमधील पवित्र भूमित आले आहेत. अयोध्येतील प्रभू श्री राम मंदिरासाठी हा शुभ संकेत आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण...

तसेच "अयोध्येत राम मंदिर बनवण्याचे स्वप्न शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचे होते. ते पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पूर्ण केले. मोदी है तो मुमकीन है. पंतप्रधान लक्षद्वीपला गेले, तर मालदीवमध्ये भूकंप आला. आपल्या देशाकडे वाईट नजरेने पाहण्याची हिंमत कुणाचीही नाही. भारताचा डंका जगभरात वाजत आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक केले.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नाशिकमध्ये पंतप्रधान मोदींचा भव्य रोड शो...

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाशिकमध्ये भव्य स्वागत करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंतप्रधानांचे स्वागत केले. यावेळी सुमारे दीड किलोमीटरचा भव्य रोड शो करण्यात आला.

या रोड शो दरम्यान जय श्री रामच्या घोषणांनी परिसर दणाणून गेल्याचे पाहायला मिळाले. आगामी लोकसभेच्या दृष्टीने पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्याला विशेष महत्व आहे. त्यामुळेच या दौऱ्यामध्ये पंतप्रधान मोदींसह भाजपकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येत आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: शिवेंद्रराजेंच्या लेकीचा शाही लग्नसोहळा, दिग्गजांची उपस्थिती

Crime News: शिवरस्त्याची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांना दाखवली पिस्तूल; चक्क पोलिसांसमोरच धमकावलं| व्हिडिओ व्हायरल

मध्य रेल्वेच्या आणखी एका रेल्वे स्टेशनचे नाव बदलले; आता नवीन नाव काय?

Amla Murabba Recipe: थंडीत आवळा मुरंबा कसा बनवायचा?

Sakal Survey: महायुती सरकार ठरलं अव्वल! कोणत्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्त्वात पायाभूत सुविधांवर झालं सर्वाधिक काम?

SCROLL FOR NEXT